राष्ट्रविकासात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची -विशेष कार्यअधिकारी प्रा. श्रीकांत भारतीय
पंढरपूर LIVE 5 सप्टेंबर 2018
पंढरपूरः (संतोष हलकुडे) ‘पूर्वीपासून ते आजतागायत ‘शिक्षक दिन’ साजरा केला जातो. यामागची भूमिका समजून घेताना विद्यार्थ्यांनी ज्या शिक्षकांमुळे आपला विकास झाला, प्रगती झाली असे वाटते त्या शिक्षकांच्या कुटुंबियांसाठी काकणभर तरी योगदान द्यावे. कारण त्या शिक्षकाने आपल्याला घडविताना प्रचंड कष्ट सोसलेले असते. म्हणून राष्ट्राच्या विकासात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरत आहे.’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्यअधिकारी प्रा. श्रीकांत भारतीय यांनी शिक्षक दिनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मध्यवर्ती असलेल्या अॅम्पिथिएटरमध्ये भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या ‘शिक्षक दिना’च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्यअधिकारी प्रा. श्रीकांत भारतीय हे विद्यार्थी व प्राध्यापकांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. मृणालिनी फडणवीस ह्या होत्या. भारतरत्न डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी स्वेरीच्या उभारणीची संघर्षपुर्ण वाटचाल कथित करुन ‘शिक्षकदिना’चे महत्व पटवून दिले. पुढे बोलताना विशेष कार्यअधिकारी प्रा. श्रीकांत भारतीय म्हणाले,‘ स्वेरी हे ‘स्वेरी’ नसून ‘सोयरे’ आहे. कारण येथील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व संस्कार रुजलेले आहेत. ही बाब अभिनंदनीय आहे. असे सांगून गुरु- शिष्याचे महत्व पटवून त्यांनी पौरात्य काळातील उदाहरणे देवून शिक्षकांचे महत्व कायम राखण्याचे आवाहन केले. यावेळी. ऐश्वर्या मासाळ, चैतन्य कापशीकर, टी.सी.एस. कंपनीत रुजू झालेले स्वेरीचे माजी विध्यार्थी अक्षय मोरे, प्रा. विक्रम मगर यांनी शिक्षक दिनाचे महत्व पटविणारी लक्षवेधी भाषणे दिली. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू फडणवीस म्हणाल्या की, ‘संतांनी कोणतीही पदवी घेतली नाही तरीही त्यांनी आदर्श संस्कृती निर्माण केली आणि रुजविली. म्हणून विद्यार्थी सतत चिकीत्सक असले पाहिजे, सतत प्रश्न पडले पाहिजे. येथील वातावरण संशोधनाचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना सतत ‘काय, कधी, कुठे, केव्ह्ना कशामुळे हे पाच प्रश्न पडले पाहिजे. ‘ असे सांगून मी कुलुगुरू पद हाती घेतल्यापासून अनेक कार्यक्रम केले. परंतु स्वेरीसारखी शिस्त खूप कमी ठकाणी पहायला मिळते.’ यावेळी महाविद्यालयाच्या आवारात पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपन देखील करण्यात आले. संपूर्ण दिवसभर महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थी हे शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत होते. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. विकास कदम, अफसर मुलाणी, सचिदानंद चिखले, सुवर्णा टकले, राजेंद्र कोरे, बाळासाहेब गोरे, तसेच पी.एच.डी.पदवी संपादित केलेले स्वेरीतील शिक्षक डॉ. आर.आर.गिड्डे, डॉ. ए.बी.शिंदे, डॉ. संतोष साळुंखे, बी. फार्मसीचे प्राचार्या डॉ. एस.डी. सोनवणे, डॉ. आर.डी.बेंदगुडे तसेच संशोधन पेपरद्वारे निधी मिळविणारे डॉ. अभय उत्पात, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डॉ. एस.एस. आपटे, प्रा. व्ही.डी.जाधव, प्रा. जयंत बोकेफोडे, प्रा. पी.जी.गायकवाड आंतरराष्ट्रीय पेपर सादर केलेले शिक्षक प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, उपप्राचार्य प्रा. एस.एन.कुलकर्णी, प्रा. व्ही.एस.क्षीरसागर, डॉ. प्रशांत पवार, प्रा. संदीप वांगीकर, प्रा. दिप्ती तंबोली, प्रा. महेश मठपती, प्रा. श्रीकृष्ण भोसले, प्रा. अविनाश पारखे, प्रा. नवनाथ स्वामी, प्रा.एम.एम. पवार आदी प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तेजस्विनी फरकांदे, आशुतोष डोळे, स्वप्नील रोपळेकर यांनी पाहुण्यांना विविध प्रश्न विचारले. यावर त्यांनी देखील समर्पक उत्तरे दिली. यावेळी डॉ. प्रशम कोल्हे, गोपाळपूरच्या सरपंच सौ विजया जगताप, उपसरपंच उज्वला बनसोडे, ग्रामसेविका ज्योती पाटील, सो.वि.सोचे राज्यपाल नियुक्त सदस्य महेश माने, अॅड.कळके, सो.वि.सो व्यवस्थापन परिषदेचे अश्विनी चव्हाण, माजी अध्यक्ष व विश्वस्त विजय शेलार, माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस.कागदे, विश्वस्त बी.डी.रोंगे, सुरज रोंगे, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयाचे सुमारे ४ हजार विद्यार्थी, पालक उपस्थित होते. आगमन करतेवेळीचे नियोजन व सत्कारावेळीचे सुरेल बासरीवादन यामुळे परिसरात उत्साह वाढत होता. सुत्रसंचालन प्रा.यशपाल खेडकर यांनी केले तर स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com