डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यु झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

Pandharpur Live 15 September 2018


पंढरपूर येथील ‘लाईफलाईन’ सुपर स्पेशालिस्ट म्हणवून घेणार्‍या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यु झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. एवढंच नव्हे तर पोस्टमार्टेम नंतर सदर रुग्णचा मृतदेह लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये आणुन ठेवला. हा मृत्यु या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाला आहे. रिपोर्ट मध्ये डॉक्टरांनी फेरफार केला आहे. असा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती.




कोर्टी, ता.पंढरपूर येथील हसन बुर्‍हाण शेख (वय-40) असे मयत झालेल्या रुग्णाचे नांव असून कांही दिवसापूर्वी त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे या हॉस्पिटलमध्ये त्याला अ‍ॅडमिट करण्यात आले होते. या हॉस्पिटलमध्ये 5 दिवस त्याच्यावर उपचार चालु होते. परंतु शुक्रवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला होता.

आज नातेवाईकांनी या हॉस्पिटल प्रशासनावर व डॉक्टरांवर आरोप केल्यानंतर या हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर संजय देशमुख यांनी दवाखान्यातून पळ काढल्याची चर्चा आहे. हॉस्पिटलच्या आवारात चार-पाचशे लोक जमा झाले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. या घटनेसंदर्भात अद्यापही हॉस्पिटलच्या एकाही जबाबदार व्यक्तीने कोणतेही विधान केलेले नाही.  याबाबत पंढरपूर लाईव्हकडे रुग्नाच्या नातेवाईकांनी आपली व्यथा व्यक्त केलीय. 









  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com