मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरीत तरूणाची आत्महत्या
Pandharpur Live 11 September 2018
पंढरपूर - टाकळी रोड येथील अमोल विष्णु कदम (वय-28) या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समजते. प्रताप नगर, टाकळी रोड, पंढरपूर येथे वास्तव्यास असलेल्या अमोलचे शिक्षण 12 वी पर्यंत झाले होते. त्याला दोन भाऊ असून तिघाही भावांना कोणतीही नोकरी नव्हती. अमोलला पुढे शिक्षण घ्यायची इच्छा होती परंतु परिस्थितीमुळे त्याला पुढील शिक्षण घेता आले नाही. नोकरी नसल्यामुळे अमोलचे लग्नही जुळत नव्हते. ''मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनं होत असतानाही मराठयांना आरक्षण मिळत नाही, मराठा तरुणांना आरक्षण नसल्यामुळे नोकरी मिळत नाही. शिकुन तर काय उपयोग असा तो वारंवार म्हणायचा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तो हल्ली खुपच भावनिक व्हायचा व शासनाला जाग कधी येईल? मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही? असे प्रश्न विचारायचा. आज अखेर अमोलनं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करुन आपले जीवन संपवले.'' अशी माहिती अमोल चे चुलते व संभाजी ब्रिगेडचे नेते स्वागत कदम यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.
दरम्यान मराठा तरुणांवर चुकीचे गुन्हे नोंद करुन त्यांचे अटकसत्र सुरु केल्याच्या निषेधार्थ पंढरीत तहसिल कार्यालय येथे सकल मराठा समाजाच्य वतीने जेलभरो आंदोलन सुरु असतानाच अमोलने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणखी किती मराठा तरुणांचे बळी जाण्याची वाट पहात आहेत अशी तीव्र प्रतिक्रिया मराठा समाजामधून उमटत आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com