आजची पत्रकारिता प्रभावी व गतिमान होत आहे.-प्रांताधिकारी सचिन ढोले

पंढरपूर LIVE 29 आॅगस्ट  2018







पत्रकारिता कालआज आणि उद्या’ या विषयावर स्वेरीत राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
पंढरपूर- (संतोष हलकुडे) समाजातील विविध घटकांनाविषयांनासमस्यांना स्पर्श करून पत्रकार हा समाजाचा आरसा होऊन काम करत आहे असे असताना समाजातील विविध घटकांनी घेतलेली भूमिका पत्रकार अत्यंत जबाबदारीने मांडत असताना तारेवरची कसरत करावी लागते. यातून  आजची पत्रकारिता अधिक प्रभावी व गतिमान होत आहे. यासाठी पत्रकारांना अधिकाधिक सकारात्मक बातम्या तयार करून  प्रसिद्ध करण्याची जबाबदारी वाढली आहे. पत्रकारांच्या प्रभावी लेखणीवर समाजातील अंतरंग उलगडता येऊ शकते.असे प्रतिपादन पंढरपूरचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले.



         स्वेरीमध्ये सोलापूर विद्यापीठसोलापूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनीरिंगपंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारिता कालआज आणि उद्या’ या विषयावर पत्रकारांसाठी आयोजिलेल्या राज्यस्तरीय एकदिवशीय कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी प्रांताधिकारी ढोले उपस्थितांसमोर बोलत होते. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनानंतर कार्यशाळेचे समन्वयक व स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी प्रास्तविकात राज्यस्तरीय कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू सांगितला तर सोलापूर विद्यापीठ सोलापूरमधील पत्रकारिता आणि जनसंज्ञापन’ विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र  चिंचोलकर यानी पत्रकारांची नेमकी भूमिका,आजची पत्रकारिता आणि यासाठी आवश्यक बदल काय करावे याबाबत मत मांडून सुंदर व नेटके आयोजन केल्यामुळे स्वेरीचे कौतुक केले. पंढरपुरचे नूतन पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी देखील माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारांची लेखणी ही समाज सुधारणा घडवून आणत असताना गतिमान झालेली पत्रकारिता आज प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचत आहे.’ असे सांगितले. सोलापूर विद्यापीठसोलापूरच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्यस्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले की,  पत्रकारांच्या भूमिकेमुळे  समाजात अधिक सुधारणा होवून एक नवी दिशा मिळत असते. ज्यावेळी समाजातील एखादा घटक चुकतो तेव्हा कान पकडून झालेल्या चुकीची जाणीव करून देतात तर कौतुकास्पद कामगिरीसाठी जगासमोर आणून खुल्या मनाने पाठीवर कौतुकाची थाप देखील टाकतात. त्यामुळे पत्रकारांची भूमिका समाज सुधारणेत महत्वाची भूमिका पार पाडते.’ असे सांगून स्वेरीच्या खडतर वाटचालीला मिळालेल्या अभूतपूर्व यशात पत्रकारांचा सिंहाचा वाटा असल्याचे देखील प्राचार्य डॉ. रोंगे यांनी सांगितले. पहिल्या सत्रात  वृत्तवाहिन्यांचे महत्व आणि मर्यादा’ या विषयावर मार्गदर्शन करताना साम टिव्हीमुंबईचे संपादक निलेश खरे म्हणाले की ‘ माध्यम हे तंत्रज्ञानाच्या बळावर बदलत आहे. त्यामुळे पत्रकारांनी तंत्रज्ञान आत्मसात करून बदलत्या प्रवाहात योग्य तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे. मर्यादांचा वापर जुजबी करून समाजाला उत्तरे देण्याचा अधिक प्रयत्न पत्रकारांनी केले पाहिजे.त्यासाठी पत्रकारांनी वस्तुस्थितीचे दर्शन दिले पाहिजे. एकूणच पत्रकारिता योग्य दिशेने जाईल यासाठी पत्रकारांनी प्रयत्न केले पाहिजे.’ असे सांगितले. दुसऱ्या सत्रात प्रिंट मिडियाचे भवितव्य काय ?’ या विषयावर मुंबईचे माध्यमतज्ञ युवराज मोहिते म्हणाले की, पत्रकारितेमधील यश हे त्या पत्रकारांनी घेतलेल्या भूमिकेवर असते यासाठी तंत्रज्ञान व नवीन माहिती याची श्रीमंती अनुभवावी लागते. सोशल मिडीयाच्या युगात बातम्यांची जागा आता जाहिरातीने व्यापली असून पत्रकारांनी समाजाला मोजक्या शब्दात जास्त आशय द्यावा.’ असे त्यांनी सुचविले. 

तिसऱ्या सत्रात पर्यायी माध्यमांचे प्रयोग’ या विषयावर मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर म्हणाले की, ‘ महत्वाची जबाबदारी पार पडताना मिळालेल्या प्रत्येक माहितीची खात्री करा वैश्विक जगात  पत्रकारिता करतांना खऱ्याला खरेच आहे’ असे म्हणण्याची ताकत असावी लागते. डिझीटल माध्यमांना वेळ व माहिती अधिक वाढविता येते. आणि सतत प्रश्न विचारणे हीच पर्यायाची खरी ताकत आहे. त्यामुळे पत्रकारांनी वस्तुस्थिती लिहिताना कशाचीही भीती बाळगू नये. माध्यमांचा पुरे-पूर वापर करून तंत्रज्ञान वापरून समाजापुढे वास्तववादी विचार मांडले पाहिजे.’ या तिन्ही सत्रातील अध्यक्ष म्हणाले की अनुक्रमे दैनिक पंढरी संचारचे संपादक व जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे म्हणाले की, ‘आम्ही जवळपास पंचावन्न वर्षापासून पत्रकारिता करतो,यासाठी लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर आहे. असे असले तरीही आजच्या इलेक्ट्रोनिक मिडीयाच्या जगात वास्तवतेसाठी प्रिंट मिडियाचे महत्व कमी झालेले नाही. याचे वाचक कमी झाले परंतु विश्वासार्हता मात्र अजूनही टिकून आहे.’ दैनिक दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक श्रीकांत कांबळे म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात माध्यमांची क्रांती होत आहे. यामुळे जोपर्यंत पत्रकारिता आहे तोपर्यंत तोपर्यंत प्रिंट मिडियाचे महत्व राहणार आहे.’ दैनिक सकाळसोलापूरचे सहसंपादक अभय दिवाणजी म्हणाले की,  संपूर्ण जग  बदलणे हे आपल्या हातात नसले तरी आपण किमान दोन माणसांना तरी बदलू शकतो. यामुळे प्रथम समाज परिवर्तन करण्यासाठी आपली मानसिकता बदलली पाहिजे.’ संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा यांनी देखील पत्रकारितेवर भाष्य करून पत्रकारितेचे महत्व किती आहे. हे स्पष्ट केले. यानंतर चिपळूण मधील श्रमिक सहयोगचे कार्यवाह राजन इंदुलकर (वंचितांच्या घटकातील मुलांचे शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली खुलीचर्चा’ पार पडली यामध्ये मान्यवरांना उपस्थितांनी पत्रकारिता करताना येणाऱ्या अडचणी विचारून त्यावरील समस्या मांडल्या. मान्यवरांनी सर्व उत्तरे दिली यामुळे उपस्थित पत्रकार अधिक उत्साही दिसत होते. पुढारीचे उपसंपादक सिद्धार्थ ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचा समारोप झाला. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याचे दिसून आले. उपस्थित पत्रकारांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये अभूतपूर्व विजय प्राप्त केल्याबद्धल पत्रकारांच्या वतीने अभिराज उबाळे यांनी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांचा सत्कार करण्याचा प्रस्ताव मांडला. यामुळे जेष्ठ पत्रकार अभय जोशी यांच्या हस्ते  डॉ. बी.पी.रोंगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कॉलेज कॅम्पसमध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. यावेळी सोलापुर जिल्हा माहिती कार्यालयाचे रविंद्र राऊत, सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडियातील साधारण २७५ हून अधिक पत्रकारसोलपुर विद्यापीठातील पत्रकारिता विभागातील विद्यार्थी,संस्थेचे माजी अध्यक्ष धनंजय सालविठ्ठलविश्वस्त बी.डी.रोंगेस्वेरीचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. एस.एन.कुलकर्णी यांनी केले तर कार्यशाळेचे समन्वयक व स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी आभार मानले. 



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com