मतदार छायाचित्र याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

पंढरपूर LIVE 28 आॅगस्ट  2018

 

पंढरपूर-दि.29- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पंढरपूर विधानसभा मदार संघामध्ये  दिनांक 1 जानेवारी  2019  या अर्हता दिनांकावर  आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा  संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम  दिनांक 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.



पंढरपूर विधानसभा मतदार संघातील युवक –युवतीचे वय 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर 18 वर्षे पुर्ण होत आहे. अशा युवक-युवतींनी व नागरीकांनी तसेच ज्या नागरीकांची नावे अद्यापपर्यंत मतदार यादीमध्ये समाविष्ठ नाहीत. या नागरिकांनी आपली नावे आवश्यकत्या पुराव्यासह आपल्या मतदार यादीभागासाठी नियुक्त मतदान अधिकारी, तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय अथवा  NSVP  या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने  दिनांक 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत नोंदवावीत.
तसेच ज्या नागरीकांनी  संबधित मतदार यादीत नाव होते. तेथील नांव वगळले असल्याबाबतचा पुरावा हा सध्याच्या पत्त्यासह रंगीत छायाचित्र व वयाच्या दाखल्यासह सादर करुन नोंदणी करणे आवश्यक आहे.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 पुर्वी मतदार नोंदणी करण्याची ही अंतीम संधी आहे. तरी ज्या मतदारांची नांवे मतदार यादीत समाविष्ठ नाहीत अशा नागरीकांनी आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीत करावी  असे आवहन मतदार नोंदणी अधिकारी सचिन ढोले व सहा.मतदार नोंदणी अधिकारी मधुसूदन बर्गे यांनी केले आहे.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com