पंढरपुर तालुका पोलीस स्टेशनचा वाळु चोरट्यांना दणका..! तपकिरी शेटफळ येथे वाळु तस्करावर कारवाई... एक ट्रॅक्टर ड़ंपिंग व वाळुसह पाच लाख 4 हजाराच्या मुद्देमालासह आरोपी ताब्यात!

पंढरपूर LIVE 29 आॅगस्ट  2018


पंढरपुर :-पोलीस निरीक्षक मा. श्री.धनंजय जाधव सो यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली  पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैधरित्या वाळु उपसा करणार्‍या वाळु चोरट्यांना दणका देण्याचे सत्र सुरु ठेवले असून आज दि. 29-08-2018  रात्री 12-30  वा.सुमारास मौजे तपकिरी शेटफळ येथील वाळु त्सकरावर कारवाई करुन एक ट्रॅक्टर ड़ंपिंग व वाळुसह पाच लाख 4 हजाराच्या मुद्देमालासह आरोपीस ताब्यात घेतले आहे.

 येथे माण नदी पात्रातुन चोरुन अवैध वाळु उपसा करुन वाळुची वाहतुक करीत असलेची गोपनीय बातमी मिळालेने सदर ठिकाणी गेलो असता माण नदीपात्रातात एक निळे रंगाचा न्यु हॉलंड़ कंपनीचा ट्रक्टर व लाल डंपिग त्यात एक ब्रास वाळु  विनापरवाना अवैधरित्या माण नदीपात्रातुन उपसा करुन नेत असताना मिळुन आलेने ट्रक्टर व लाल डंपिग वाळु सह किं अं 5,04,000/- असा मुद्देमाल जप्त करुन आरोपी नामे सिताराम नारायण बनसोडे वय 23 रा.तपकिरी शेटफळ याचेविरुध्द पोलीस नाईक सचिन इंगळे यांनी भादवि कलम 379 तसेच पर्यावरण कायदा कलम 9,15 प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दिली असुन पुढील तपास पोना तुकाराम कोळी हे करित आहेत.
         सदरची कारवाई मा.पोलीस निरीक्षक श्री.धनंजय जाधव साहेब यांच्या मार्गदशनाखाली पंढरपुर तालुका पोलीस ठाणे कडील पी.एस.आय  प्रताप वसगड़े सो, पोलीस नाईक सचिन इंगळे ,अभिजीत मुळे,गणेश शिंदे यांनी कामगिरी  केली.




  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com