ना लाज ना शरम.... विठोबाच्या दर्शन पासचा काळाबाजार खुशाल करतात बेशरम..!

पंढरपूर LIVE 31 आॅगस्ट  2018


भ्रष्टाचार प्रत्येक क्षेत्रात बोकाळलेला आहेच; परंतु चक्क देवाच्या दरबारातही भ्रष्टाचार आपली पाळेमुळे पसरवु पहात आहे. लाज-शरम सोडून विठोबाच्या दर्शनासाठीच्या व्हीआयपी पासमध्ये काळा बाजार करुन दलाली खाणारी बेशरम मंडळी उजळ माथ्याने दलाली करताना आढळत आहेत. 

पांडुरंगाच्या दर्शनासाठी देण्यात येणार्‍या व्हीआयपी पासची विक्री होत असल्याचे उघड झाले असून दर्शन पासची विक्री करणार्‍याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कैलास डोके याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  कैलास डोके हा मंदिर परिसरात हार विक्रीचे काम करतो. परंतु त्याने हैद्राबादच्या एका भाविकाला व्हीआयपी दर्शन पास विकुन दर्शनास पाठवले असताना पोलिसांना संशय आला. अधिक चौकशी अंती हा पास बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने डोकेवर गुन्हा दाखल केला. 

हैदराबाद येथील भाविक  श्रीनिवासराव प्रसाद राव पीठे  व त्याची पत्नी सौ लक्ष्मी श्रीनिवासराव पीठे हे दोघे  गुरुवारी चारच्या सुमारास विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी कैलास डोके या दलालाने त्यांना दर्शनासाठी खूप गर्दी आहे. तुम्हाला शॉर्टकट मार्गाने १० मिनिटांमध्ये दर्शन देतो, प्रत्येक व्यक्ती एक हजार रुपये द्या अशी मागणी केली. शेवटी तडजोडीत प्रति व्यक्ती ४०० रुपये देण्याचे ठरले. दलाल डोके याने मंदिर समितीच्या एका सदस्याला फोन करून पासची व्यवस्था केली.
 
त्यानंतर पास घेऊन दलाल आणि भाविक मंदिरात जात असताना मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी असलेले पोलीस कॉन्स्टेबल वामन यलमार यांना संशय आल्याने त्यांनी या तिघांना हटकले. तेंव्हा दलालाने दर्शनाचा व्हीआयपी पास असल्याचे सांगून मंदिर समितीचा पास दाखवला. आंध्रमधील भाविकांना पास कसा दिला गेला. यात काही तरी गोलमाल असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल यलमार यांनी सदर भाविकांकडे अधिक चौकशी केली असता, दलालाने शॉर्टकट दर्शन घडवून देतो असे सांगून प्रत्येकी ४०० रुपये दिल्याचे भाविकांनी सांगितले.

देवाच्या दर्शनाचाही काळा बाजार करणार्‍या अशा दलालांचा हा गोरख कारभार गेल्या किती दिवसापासून चालु आहे? अजुन कोणकोण यामध्ये सामील आहेत? याची सखोल चौकशी करुन पोलिसांनी संबंधीत गुन्ह्यात सामील असणार्‍या सर्वांनाच जेरबंद करुन उघडं पाडणं गरजेचं असल्याची भावना भाविकांमधून व्यक्त होत आहे.  
असे काही घडलेच नाही, अशी मंदिर समितीची सुरुवातीला भूमिका
पोलिसांनी पुराव्यासह केलेल्या या भांडाफोडी नंतर मंदिर समितीने मात्र असे काही घडले नाही अशी भूमिका घेतली, मात्र पोलिसांनी कोणाचाही दबाव न घेता रात्री उशिरा कैलास डोके याच्यावर गुन्हा दाखल केला. मंदिर परिसरात पैसे घेऊन दर्शनाला सोडणाऱ्यांचे फार मोठे रॅकेट असल्याचे यामुळे सिद्ध होत आहे. मंदिर समितीच्या सदस्यानेच हे व्हीआयपी पास दिले असल्याने त्यांचा देखील या गोष्टीना पाठबळ असण्याची दाट शक्यता आहे .  विकत दर्शनाच्या या व्यवस्थेला मंदिर समितीचे कर्मचारी आणि सदस्यांचा वरदहस्त असल्याने दररोज हजारो भाविकांना व्हीआयपी दर्शन दिले जात आहे हे या निमित्ताने समोर आले आहे. 

यापूर्वी ही घडल्या अशा घटना.. ठोस कारवाईच्या नावाने आळीमिळी-गुपचिळी!  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देवाच्या दर्शनासाठी पैसे घेऊन दर्शनासाठी सोडण्यात येत असल्याच्या अनेक घटना या पूर्वी देखील घडलेल्या आहेत. या घटना घडत असताना मंदिर समितीने योग्य वेळी योग्य ती काळजी घेणे गरजेचे होते मात्र तसे न झाल्यामुळे दर्शनाचा हा काळाबाजार वाढतच चालला आहे. आषाढी एकादशीच्या वेळेस असा प्रकार उघडकीस आल्यानंतर मंदिर समितीने आठ कर्मचाऱ्यावर जुजबी कारवाई केली होती. त्याच वेळी कठोर कारवाई झाली असती तर अशा प्रकारावर आळा बसला असता किंवा  असे प्रकार करण्याचे धाडस झाले नसते. परंतु मंदिर समितीकडून ठोस कारवाईच होत नसल्याने सर्व कांही अअळीमिळी-गुपचिळी चालल्याचा संशय निर्माण होत आहे.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com