चंद्रभागेचे पात्र बनले धोकादायक... आठ दिवसात तिघांचा मृत्यू... नदीच्या काठावर जीवरक्षक नेमणे आवश्यक!

पंढरपूर LIVE 29आॅगस्ट  2018

पंढरपूर : उजनी धरण 100% भरल्यामुळे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदी दुथडी भरुन वाहत आहे. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची पाणीपातळीही वाढलेली आहे. वाळु चोरट्यांनी नदीत पाडलेल्या खड्डयांमुळे चंद्रभागेचे पात्र धोकादायक बनले असून आंघोळीसाठी पात्रात उतरल्या नंतर पाण्याच्या खोलीचा व वेगाचा अंदाज न गेल्या आठ दिवसात तिघाजणांचा पात्रात वाहून जाऊन बुडून मृत्यु झाला आहे.



 चंद्रभागेच्या पात्रामध्ये जळगाव येथील चार भाविक वाहून गेल्याची घटना घडली  होती. यामधील तीन भाविकांना वाचवण्यात कोळी बांधवांनी यश मिळविले. परंतु मात्र राहुल रविंद्र काथार (वय- 25 रा. जळगाव ) याचा बुडून मृत्यू झाला. जळगाव येथील हे भाविक चंद्रभागेच्या स्नानासाठी पात्रात उतरले होते. पण उजनी धरणातून पात्रात पाणी सोडल्याने नदीला पूर सदृश्य परिस्थिती आहे. या वाहत्या पात्रात  नितिन दत्तू कुबर (वय-22), राजेंद्र अशोक सोनार (वय-22), भरत रविंद्र काथार (वय-22), आणि त्याचा मोठा भाऊ राहुल रविंद्र काथार असे चौघे चंद्रभागेत स्नानासाठी गेले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघेही पाण्यात वाहून गेले होते. आजुबाजुच्या होडीचालक कोळी बांधौांनी त्यांना पाण्यात बुडताना पाहिलं आणि त्यांनी मोठ्यआ साहसाने बोटीच्या मदतीने तिघांना वाचवलं. पण राहूलचा दुर्देवाने पाण्यात बुडून मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांमध्ये कर्नाटकातील लखन टोंपे तसेच मंगळवारी मंगळवेढ्याचे सचिन बिराजदार आणि आज जळगावच्या राहुलचा मृत्यू झाला आहे. या तिघांच्या मृत्यूच्या निमित्ताने चंद्रभागा तटावरील भाविकांचे आपत्कालीन परिस्थिती बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाला असून चंद्रभागेच्या तीरावर जीवरक्षक नेमण्यात यावेत अशी मागणी जोर धरत आहे.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com