लोट्सच्या नेहा डुबल हिचा १ जून रोजी दिल्लीत होणार सत्कार..! ‘ऑलंम्पियाड’ मध्ये नेहा डुबल देशात दुसरी
पंढरपूर LIVE 5 मे 2018
पंढरपूर-कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिटयुट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपुर संचलित लोटस इंग्लिश स्कुलमधील पाचवीमध्ये शिक्षण घेणारी नेहा कांतीलाल डुबल हिची आंतरराष्ट्रीय जनरल नॉलेजच्या ऑलंम्पियाड स्पर्धेमध्ये देशात दुसरा क्रमांक पटकाविला यामुळे तिची पुढील निवड राष्ट्रीय पुरस्कारासाठी झाली असल्याचे ‘ऑलंम्पियाड परीक्षा मंडळातर्फे कळविले आहे. ‘ऑलंम्पियाड’ ही स्पर्धा ३० देशात घेतली जाते. यंदाच्या परीक्षेत १९०० शहरांमधून ४५ हजार शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामधून तीन क्रमांक काढले असून या तीन विजेत्यांपैकीच नेहा डुबल ही एक आहे. त्यामुळे पंढरपूर पंचक्रोशीत नेहा डुबल हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
उच्चतंत्र शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुंबई पुण्यासारख्या मोठ्या गावात जावे लागत होते. काहीजण जायचे तर काहीजण हुशार असूनही केवळ अर्थकारणामुळे शिक्षण अर्ध्यावर थांबवायचे आणि हीच कमतरता शिक्षणतज्ञ डॉ. बी.पी.रोंगे यांनी ओळखून गोपाळपुरात अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन केले. त्यानंतर अपार मेहनत आणि प्रामाणिक कष्टाच्या बळावर विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशासकीय क्षेत्रात उच्च अधिकारी, उद्योजक, प्राध्यापक बनविले. तेच विद्यार्थी मुंबई-पुण्याच्या विद्यार्थ्यांशी साहजिकच स्पर्धेत उतरले आणि काही वर्षापूर्वी पासून स्वेरीच्या यशाचा पाढा राज्यभर वाचू लागला आणि साहजिकच यामुळे पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकांची अपेक्षा आणखीन वाढली आणि सध्याचे स्पर्धेचे युग पाहता लहान मुलांसाठी देखील इंग्रजी माध्यमाची शाळा असावी ही अपेक्षा व्यक्त केली. गरीब जनतेची अपेक्षा आणि काळाची गरज ओळखून डॉ. रोंगे यांनी कासेगाव (ता. पंढरपूर) मध्ये सन २०१० साली श्री विठ्ठल इन्स्टिटयुट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपुर संस्था स्थापित केली त्याच्या अंतर्गत लोटस इंग्लिश स्कुल हळूहळू मोठी होऊ लागली. नर्सरीपासून पासून ते दहावीपर्यंत असलेली हि लोट्स शाळा आता प्रत्येक घराघरात पोचली आहे. स्वेरीच्या धर्तीवर लोट्समध्ये देखील योग्य संस्कार करून विद्यार्थ्यांकडून नियमित अभ्यास करून घेवू लागले. पाहता पाहता लोटस इंग्लिश स्कुल देखील स्वेरीप्रमाणे यशाची उंची गाठू लागली. चिमुकले विद्यार्थी अल्पावधीत इंग्रजी बोलण्याबरोबरच वाढत्या स्पर्धेत देखील उतरली. याचेच द्योतक म्हणजे नेहा डुबल होय. नेहा डुबल हीला येत्या ३ जून रोजी दिल्ली मधील हेबीटेट सेंटर येथे होणाऱ्या पुरस्कार वितरणासाठी आमंत्रित केले आहे. त्याठीकाणी ३० देशातील विद्यार्थ्यांसमोर नेहाची पाठ थोपटणार आहे. नेहा डुबल हिला प्राचार्य डॉ. जयश्री चव्हाण, तसेच वर्गशिक्षक सोनम इंगळे, प्राथमिक विभाग प्रमुख संपत लवटे, विषय शिक्षक पल्लवी साळुंखे,आस्मा शेख, रेश्मा कोकणे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. नेहाला ‘ऑलंम्पियाड’ स्पर्धेत ४० गुणांपैकी ३९ गुण मिळाले. हिच्या यशाबद्धल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब रोंगे, अध्यक्ष बी.डी.रोंगे, उपाध्यक्ष एच.एम.बागल यांनी नेहा हिचे अभिनंदन केले. नेहाने मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्धल तिचे वडील कांतीलाल डुबल म्हणाले की, ‘नेहाने इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलंम्पियाड परीक्षेत जे यश मिळवले आहे. त्याबदद्ल आम्हाला खूप आनंद झाला आहे. आई-वडील म्हणून तिच्यासाठी केलेल्या कष्टाचे तीने चीज केल्याचे समाधानही आहे. हे यश प्राप्त करण्यासाठी लोट्सच्या शाळेचा यात मोठा वाटा आहे. तिच्या शिक्षकांनी दिलेले योग्य ज्ञान व उत्कृष्ठ मार्गदर्शन यामुळेच नेहाणे हे यश मिळवू शकली.लोटसमध्ये शिकविल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकाचा, प्रत्येक नियमांचा काटेकोरपणे पालन केल्यामुळे तिने हे यश प्राप्त केले आहे. अलीकडच्या काळात लोटस इंग्लीश स्कूल हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रतिक बनले आहे म्हणून‘लोटस’ आता नाव राहिले नसून ‘ब्रँड’ बनले आहे.’ लोट्स मधील आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे नेहाचे यश पंढरपुरच्या पंचक्रोशीत नेहा बरोबरच लोट्सच्या प्राध्यापकांचे अभिनंदन होत आहे. विद्यार्थ्यांचा विकास पाहता लोटस इंग्लिश स्कुलच्या व्यवस्थापनाची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे.त्यामुळे पंढरपूर परिसरात मधील लोटस इंग्लिश स्कुलचा बोलबाला वाढला आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com