एमएसईबी, बसस्थानक, रेल्वे स्टेशन मधील चौकशीसाठीचे दुरध्वनी असून अडचण... नसून खोळंबा! चौकशीसाठी केलेला कॉल रिसीव्हच केला जात नसल्याने पंढरपूरकरांमध्ये नाराजी!
पंढरपूर LIVE 4 मे 2018
पंढरपूर येथील एमएसईबी कार्यालय, बसस्थानक व रेल्वे स्टेशनमधील चौकशीसाठी उपलब्ध असलेले लॅन्डलाईन दुरध्वनी कधीच वेळेत उचलले जात नाहीत. कधी नुसतीच ट्रिंग ट्रिंग रिंग वाजते तर कधी फोनचा रिसीव्हरच बाजुला काढून ठेवला गेल्याने संबंधीत नंबर बिझी असल्याची सुचना मिळते. असा तक्रारीचा सुर पंढरपूरमधील अनेक नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहे. सोशल मिडीयावरुन याबाबत वेगवेगळया पोष्ट टाकून अनेकांनी आपल्या याविरुध्दच्या संतापाला वाट करुन दिली आहे.
पंढरपूर शहर एमएसईबी चा (02186) 223226 हा विद्युत ग्राहकांसाठीचा चौकशी क्रमांक, पंढरपूर बसस्थानकामधील (02186) 223114 हा चौकशीसाठीचा क्रमांक व पंढरपूर रेल्वे स्थानकामधील (02186) 220266 हा लॅन्डलाईन क्रमांक हे सर्व चौकशी साठीचे लॅन्डलाईन क्रमांक हे कधीच वेळेत रिसिव्ह होत नसल्याबाबतच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत.
पंढरपूर बसस्थानकावरील गाड्यांच्या चौकशीसाठीच्या क्रमांकावर कधीही कॉल केला तर हा फोन फक्त वाजत राहतो... फोन उचललाच जात नाही! रेल्वे स्थानकावरील फोनबाबतही हीच तर्हा!! आता बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावरचे वरील क्रमांक बदललेयेत की, नाहीच उचलला तर आपल्याला कोण विचारतोय? असा विचार करुन संबंधीत कर्मचारी हा फोन रिसिव्ह करत नाहीत. याचा शोध आता प्रवाशांनीच घेण्याची गरज निर्माण झाली आहे. किमान एमएसईबी वरील फोन कधी कधी रिसिव्ह कररुन माहिती तरी दिली जाते परंतु पंढरपूर बससस्थानकावरील चौकशीसाठीचा फोन मात्र कधीच रिसिव्ह होत नसल्याबाबतच्या अनेक तक्रारी सोशल मिडीयावर सध्या फिरताना आढळत आहेत.
अचानक वीज गेल्यानंतर ती कधी येणार व कशामुळे गेली यासाठी एमएसईबीच्या वरील क्रमांकावर कॉल केलेल्या विद्युत ग्राहकांना यासंबंधी तात्काळ माहिती देणे हे येथील कर्मचार्यांचे आद्य कर्तव्य आहे. परंतु वारंवार येणारे कॉल घेऊन तेच ते बोलायचे कदाचित संबंधीत कर्मचार्यांना कंटाळवाणे वाटत असेल म्हणून, ‘‘फोनचा रिसिव्हरच बाजुला काढून ठेवला की काम संपले!’’ असा अलबेल कारभार चालु असतोय वाटतं! अशा प्रकारे नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
एकतर वरील चौकशीसाठीचे दुरध्वनी क्रमांकावरील कॉल रिसिव्ह करणारे जबाबदार कर्मचारी नव्याने नियुक्त करावेत किंवा याला एखादा आधुनिक पर्याय निर्माण करावा. अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com