पालखीमुक्काम ठिकाणाची सर्व कामे तातडीने पुर्ण करावीत -विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

पंढरपूर LIVE 3 मे 2018

पुणे दि. 2- पालखीमुक्कामांच्या ठिकाणी सुरु असणारी सर्व कामे तातडीने पुर्ण करावीत. या कामांसाठी लागणारे भूसंपादन अथवा इतर अडचणी असल्यास त्या सोडवून जुलै पुर्वी हि कामे संपवण्याच्या  सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 
 येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पालखीमुक्कामांच्या ठिकाणी प्रगतीपथावर असलेल्या कामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.  यावेळी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, विशेष कार्यकारी अधिकारी ( तिर्थ क्षेत्र ) उत्तम चव्हाण, पुणे व साताऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर कमिटीचे मुख्य विश्वस्त डॉ. अभय टिळक, विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी आदी मान्यवर व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले, पालखीमुक्कामांच्या ठिकाणी बसवण्यात येणारे हासमास्ट, पालखीतळासाठीच्या संरक्षक भिंती, फिरते स्वच्छतागृह, सर्व पालखीमुक्कामा ठिकाणी बांधण्यात येणारा पालखी कट्टा तसेच काही ठिकाणी नियोजित सभागृह, आदी सर्व कामे पूर्ण करावीत. शासनाने या कामांसाठी 77 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
     विशेष कार्यकारी अधिकारी (तिर्थ क्षेत्र) उत्तम चव्हाण यांनी यावेळी मंजूर झालेला निधी, निधीचे करण्यात आलेले जिल्हानिहाय वितरण व प्रलंबित कामांची माहिती दिली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर कमिटीच्या विश्वस्तांनी पालखी सोहळ्यात येणाऱ्या अडचणी तसेच सुरू असलेल्या कामांबाबतच्या हरकती विभागीय अयुक्तांना सांगितल्या. 

















महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com