अटल महापणन विकास अभियानातंर्गत विभागीयस्तरीय कार्यशाळेचे आयोजन
पंढरपूर LIVE 3 मे 2018
पंढरपूर, दि. 03 :- शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत राज्यातील पणन सहकारी संस्था, खरेदी विक्री संघ तसेच विकास सहकारी संस्था यांना बळकट करण्यासाठी अटल महापणन विकास योजना सुरु करण्यात आली आहे. या अभियानातंर्गत शुक्रवार दिनांक 4 मे 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता सिंहगड इंजिनियरिंग कॉलेज, कोर्टी रोड पंढरपूर येथे विभागीयस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहकारी संस्थेचे सहाय्यक निंबधक पी.टी.घुगे यांनी दिली.
या कार्यशाळेस सहकार मंत्री मा. सुभाष देशमुख, सहकार आयुक्त व निंबधक, पणन संचालक, विभागीय सह.निंबधक उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.तसेच पुणे व सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निंबधक व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे पदाधिकारी, सचिव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अटल महापणन विकास अभियानात भाग घेवून संस्थांनी सुरु केलेल्या नविन व्यवसायाची यशोगाथा, आणि संस्थेच्या माध्यमातून आर्थिक कार्यक्षम होण्यास झालेली मदत व भविष्याचा वेध या बाबत सर्वंकष चर्चा होणार असल्याचेही सहकारी संस्थेचे सहाय्यक निंबधक श्री..घुगे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com