जनतेला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरा-- अॅड. अमित कारंडे
पंढरपूर LIVE 2 मे 2018
सध्याचे सरकार फसवे सरकार आहे. फक्त खोटे आश्वासन देणे आणि जाहिरातबाजी करणे यापलीकडे या सरकारने काहीही केलेले नाही. त्यामुळे जनतेची कामे होत नाहीत. अश्यावेळी काँग्रेस पक्षाच्या संस्कृती नूसार जनतेच्या हितासाठी काँग्रेस ओबीसी विभागाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरण्याची वेळ आता आली आहे. असे मत काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष अॅड. अमित कारंडे यांनी व्यक्त केले. पंढरपूर येथे सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाच्या जिल्हा , तालुका व शहर पदाधिकारयांच्या झालेल्या बैठकी मध्ये अॅड अमित कारंडे पदाधिकारयांना मार्गदर्शन करत होते.
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष समीर कोळी यांनी पदाधिकारयानां संबोधित करताना म्हटले कि, " ओबीसी मधील सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वांनी काम करावे. काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला जिवंत ठेवणारा पक्ष आहे. भाजपा हा हुकूमशाही प्रमाणे कार्यरत आहे. भाजपाने न्यायाधीशाच्या बदल्या केल्या. लोकशाहीचा आधारस्तंभ असणारया पत्रकारांवर दबाव आणला. काँग्रेस पक्षाने 60 वर्षात काय केले असे विचारणारया भाजपालाही माहीत आहे कि काँग्रेस पक्षाने देशासाठी काय केले आहे. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या बलिदानांचा काँग्रेस पक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मांडनारा काँग्रेस पक्ष आहे. मागासवर्गाला न्याय देणारा काँग्रेस पक्ष आहे. आता ते जनतेपर्यंत आपण सर्वांनी मिळून काँग्रेस ने साठ वर्षांत काय केले आहे ते पोहचवायचे आहे.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेस चिटणीस अमर सुर्यवंशी, काँग्रेस नेते प्रा. अशोक डोळ, जिल्हा काँग्रेस ओबीसी उपाध्यक्ष समाधान रोकडे, चंद्रसेन मल्लाव, सुभाष गायकवाड, शहर काँग्रेस अध्यक्ष अॅड. राज भादूले, काँग्रेस सेवा दलाचे गणेश माने, काँग्रेस ओबीसी पंढरपूर-मंगळवेढा निरीक्षक नासीर तांबोळी,सांगोला ता.अध्यक्ष सिध्देश्वर काळे, बाळासाहेब आसबे, ओबीसी शहराध्यक्ष मधुकर फलटणकर , प्रा. मारूती भोसले, लखन वाघमारे, बबलू बोराळकर, शिवाजी धोत्रे, महेश जाधव, गोपाळ क्षीरसागर, औदुंबर शिंदे इत्यादी मान्यवर व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com