नुतन पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे उद्घाटन संपन्न! कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे -पालकमंत्री विजयकुमार देशमुख
पंढरपूर LIVE 2 मे 2018
पंढरपूर, दि. 02 :- पंढरपूर हे राज्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे मोठ्या प्रमाणात भाविक श्री.विठ्ठल दर्शनासाठी येत असतात. तसेच तालुक्यातील वाढती लोकसंख्या पाहता नागरीकांना व भाविकांना सुरक्षित वाटावे यासाठी पोलीस प्रशासनाबरोबरच नागरीकांनी प्रयत्न करुन कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले.
सोलापूर ग्रामीण पोलीस अतंर्गत नुतन पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा पोलीस अधिक्षक एस.विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, सहाय्यक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, तालुका पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे,नुतन ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.के.माणगावे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले, पंढरपूर तालुक्यातील 24 गावांसाठी नुतन ग्रामीण पोलीस ठाण्याची सुरुवात झाली आहे. या पोलीस ठाण्यातंर्गत पालखी मार्ग येत असल्याने भविकांच्या सुरक्षततेची मोठी जबाबदारी आहे. भाविकांना प्रशासनामार्फत अनेक सेवा सुविधा पुरविल्या जातात. त्यांच्या सुरक्षतेतची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. पंढरपूर आगारातून शिवशाही बससेवा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले. तसेच नुतन ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आदर्श पोलीस व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाबरोबर नागरीकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आमदार प्रशांत परिचारक बोलताना म्हणाले पंढरपूर येथे दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात तसेच आषाढी कार्तिकी, चैत्री, माघी या यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असतात. येणा-या भाविकांना व येथील नागरीकांना सुरक्षा देण्याचे काम पोलीस प्रशासनाने चांगल्या पध्दतीने केले असून, पुढेही भाविेकांच्या व नागरीकांच्या सुरक्षतेबाबत असेच काम करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा पोलीस प्रमुख एस.विरेश प्रभु बोलताना म्हणाले, नुतन पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनअतंर्गत 24 गावांचा समावेश असून, यासाठी 3 पोलीस अधिकारी व 39 पोलीस कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनामार्फत आदर्श पोलीस व्यवस्था निमार्ण करुन भाविकांना व नागरीकांना चांगली सुरक्षा देण्यात येणार आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सोडविण्यासाठी नागरीकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी नुतन ग्रामीण पोलीस ठाण्याला भेट देवून पाहणी केली व पोलीस अधिकारी यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेबाबतची माहिती घेतली. कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळविलेल्या तालुक्यातील अभसिंह देशमुख, संतोष माळी तसेच राष्ट्रीय क्रिडा क्षेत्रात सुवर्ण पदक विजेत्या कोमल जगदाळे यांचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अभिनंदन केले. याकार्यक्रमास पोलीस अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरीक उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com