गर्जा महाराष्ट्र माझा..! महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पंढरपूर लाईव्हचा हा विशेष लेख..! महाराष्ट्र दिन चिरायु होवो! जय शिवराय! जय महाराष्ट्र!!

पंढरपूर LIVE 30 एप्रिल 2018
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे, 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेेेेल्या 105 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. युरोपात 1 मे रोजी मेपोल हा काठी महोत्सवसुद्धा साजरा होत असतो.










21 नोव्हेंबर इ.स.1956 दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.

त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसर्‍या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबारात झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 आंदोलक हुतात्मे झाले.

या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे, इ.स. 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. 1965मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.

हुतात्म्यांची नावे
21 नोव्हेंबर इ. स. 1955 चे हुतात्मे

सिताराम बनाजी पवार, जोसेफ डेव्हिड पेजारकर, चिमणलाल डी. शेठ, भास्कर नारायण कामतेकर, रामचंद्र सेवाराम
शंकर खोटे, धर्माजी गंगाराम नागवेकर, रामचंद्र लक्ष्मण जाधव, के. जे. झेवियर, पी. एस. जॉन, शरद जी. वाणी, वेदीसिंग, रामचंद्र भाटीया, गंगाराम गुणाजी, गजानन ऊर्फ बंडू गोखले, निवृत्ती विठोबा मोरे, आत्माराम पुरुषोत्तम, पानवलकर, बालप्पा मुतण्णा कामाठी, धोंडू लक्ष्मण पारडूले,भाऊ सखाराम कदम,यशवंत बाबाजी भगत,गोविंद बाबूराव जोगल,पांडूरंग धोंडू धाडवे,गोपाळ चिमाजी कोरडे,पांडूरंग बाबाजी जाधव,बाबू हरी दाते,अनुप माहावीर,विनायक पांचाळ
सिताराम गणपत म्हादे,सुभाष भिवा बोरकर,गणपत रामा तानकर,सिताराम गयादीन,गोरखनाथ रावजी जगताप,महमद अली,तुळशीराम पुंजाजी बेलसरे,देवाजी सखाराम पाटील,शामलाल जेठानंद,सदाशिव महादेव भोसले,भिकाजी पांडूरंग रंगाटे,वासुदेव सुर्याजी मांजरेकर,भिकाजी बाबू बांबरकर,सखाराम श्रीपत ढमाले,नरेंद्र नारायण प्रधान,शंकर गोपाल कुष्टे
दत्ताराम कृष्णा सावंत,बबन बापू भरगुडे,विष्णू सखाराम बने,सिताराम धोंडू राडये,तुकाराम धोंडू शिंदे,विठ्ठल गंगाराम मोरे
रामा लखन विंदा,एडवीन आमब्रोझ साळवी,बाबा महादू सावंत,वसंत द्वारकानाथ कन्याळकर,विठ्ठल दौलत साळुंखे
रामनाथ पांडूरंग अमृते,परशुराम अंबाजी देसाई,घनश्याम बाबू कोलार,धोंडू रामकृष्ण सुतार,मुनीमजी बलदेव पांडे,मारुती विठोबा म्हस्के,भाऊ कोंडीबा भास्कर,धोंडो राघो पुजारी,ह्रुदयसिंग दारजेसिंग,पांडू माहादू अवरीरकर,शंकर विठोबा राणे, विजयकुमार सदाशिव भडेकर,कृष्णाजी गणू शिंदे,रामचंद्र विठ्ठल चौगुले,धोंडू भागू जाधव,रघुनाथ सखाराम बीनगुडे,काशीनाथ गोविंद चिंदरकर,करपैया किरमल देवेंद्र,चुलाराम मुंबराज,बालमोहन,अनंता,गंगाराम विष्णू गुरव,रत्नु गोंदिवरे,सय्यद कासम,भिकाजी दाजी,अनंत गोलतकर,किसन वीरकर,सुखलाल रामलाल बंसकर,पांडूरंग विष्णू वाळके,  फुलवरी मगरु,गुलाब कृष्णा खवळे,बाबूराव देवदास पाटील,लक्ष्मण नरहरी थोरात,ठमाबाई विठ्ठल सूर्यभान,गणपत रामा भुते,मुनशी वझीऱअली,दौलतराम मथुरादास,विठ्ठल नारायण चव्हाण,देवजी शिवन राठोड,रावजीभाई डोसाभाई पटेल,होरमसजी करसेटजी,गिरधर हेमचंद लोहार,सत्तू खंडू वाईकर,गणपत श्रीधर जोशी,माधव राजाराम तुरे(बेलदार), मारुती बेन्नाळकर,मधूकर बापू बांदेकर,लक्ष्मण गोविंद गावडे,महादेव बारीगडी,कमलाबाई मोहिते. या सर्व अमर हुतात्म्यांना विनम्र अभिवादन..! आपल्या हौतात्म्यामुळेच आज संयुक्त महाराष्ट्रात आम्ही सारे ‘गर्जा महाराष्ट्र माझा!’ ही घोषणा अभिमानाने देऊ शकतोय! आपणास पंढरपूर लाईव्ह व पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशनच्या वतीने शतश: नमन!  जय शिवराय..! जय महाराष्ट्र! महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व महाराष्ट्रीयांना हार्दिक शुभेच्छा!



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com