पंढरपूरकरांची साखरझोप मोडली.. घाम फुटला... पहाटेपासून काही भागातील बत्ती गुल...
पंढरपूर LIVE 28 एप्रिल 2018
पंढरपूरकरांची साखरझोप मोडली.. घाम फुटला... पहाटेपासून काही भागातील बत्ती गुल...
आज पहाटे साडे चार वाजल्यापासून पंढरीतील काही भागातील वीज गेल्यामुळे अनेक पंढरपुरकरांना घाम सुटल्याचे चित्र आढळून आले. पंढरीत सध्या तापमानाचा पारा चढलेला असल्याने पहाटेसुध्दा पंखा, ए.सी., कुलर ही वीजेवर चालणारी साधने सुरूच ठेवावी लागतात. परंतु पहाटे साडेचार वाजल्यापासून वीजच गेल्यामुळे अनेक पंढरपूरकरांना अक्षरशः साखरझोपेतून उठत आपापल्या घराची दारे खिडक्या पहाटेच उघडून "निसर्गाचा वारा" च बरा! असल्याचा अनुभव आला. लिंक रोड परिसरातील अनेक उपनगरातील वीज गेली होती. याच भागात जलशुद्धीकरण केंद्र असल्याने वीज गेल्याचा फटका शहराच्या पाणीपुरवठ्यावरही झाला. सकाळी आठ वाजता नळाला पाणी आलेच नाही.
वीज गेल्यानंतर ती कशामुळे गेलीय व कधी येणार? याची चौकशी करण्यासाठी एम. एस. ई. बी. कडे काॅल करून विचारणा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक नागरिकांच्या पदरी निराशा पडल्याचे समजते. कारण हा लॅन्डलाईन कायम "व्यस्त" च लागतो अशी तक्रार आहे. अनेकांच्या घरातले पाणी संपलेले होते, वीजेविना बोअर चालत नव्हते, वीज कधी येणार हे ही समजत नव्हते. त्यामुळे पंढरपूरकरांची साखरझोप उडून गेली. वीज किती महत्वाची आहे याची प्रचिती येण्याबरोबरच आपल्या परिसरात झाडे हवीत आणि घरात पाणी शिल्लक हवे. याची जाणसुध्दा अनेक पंढरपूरकरांना आज झाली असेल.
पहाटे साडेचार ते साडे सात वाजेपर्यंत वीज घालवण्याचे कारण जाणुन घेण्याचा प्रयत्न "पंढरपूर लाईव्ह" ने केला असता, "लिंक रोडवरील सबस्टेशनच्या तारा पहाटे तुटल्याने काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तातडीने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरूस्तीचे काम हाती घेतले व तीन तासानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला." अशी माहिती मिळाली.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com