पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५७वा वर्धापन दिन व कामगार दिन साजरा.
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५७वा वर्धापन दिन व कामगार दिन साजरा.
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५७वा वर्धापन दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते उपनगराध्यक्षा सौ.सुजाता बडवे, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गटनेते गुरुदास अभ्यंकर, नगरसेविका रेणुका घोडके, शकुंतला नडगिरे, सुप्रिया डांगे, अनुसया शिरसट, नगरसेवक संजय निंबाळकर, विवेक परदेशी, नरसिंह शिंगण, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या ध्वजारोहण कार्यक्रमास ध्वजनी म्हणुन सुनील वाळुजकर यांनी कार्य केले.