पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने श्री.शिवबा काशीद जयंती साजरी

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने श्री.शिवबा काशीद जयंती साजरी
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने श्री.शिवबा काशीद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, नाभिक युवक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सतिष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली, मुरलीधर शेटे, महेश माने, बाळासाहेब देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास गणेश माने, महादेव शिंदे, मनोज गावटे, अनिल शेटे, भोला शिंदे, दिपक खंडागळे, संतोष हिल्लाळ नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जनसंपर्क अधिकारी सुनील वाळुजकर यांनी केले.