पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने कामगार दिनानिमित्त आदर्श कामगार पुरस्कार प्रदान.

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने कामगार दिनानिमित्त आदर्श कामगार पुरस्कार प्रदान.
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५७वा वर्धापन दिन, कामगार दिन व नगरविकास दिनानिमित्त आरोग्य विभागाकडील सफाई कर्मचा-यांना नगरपरिषदेच्यावतीने गुणवंत व आदर्श कामगार पुरस्कार नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या हस्ते, उपनगराध्यक्षा सौ.सुजाता बडवे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगरपरिषद कामगार संघटनेचे राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनील वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सफाई कर्मचारी रंजना दत्तु वाघमारे, भगवान तात्या सर्वगोड, अशोक काशीनाथ रणदिवे, सविता पशी मेहडा, गणपत छोटा सोलंकी, मिना सुरेश वाघेला यांना आदर्श कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी बोलताना सांगितले की, पंढरपूर हे तिर्थक्षेत्र असल्याने वर्षातुन भरणा-या चार मोठ्या यात्रा, दर महिन्याची एकादशी व संपुर्ण भारतातुन दररोज येणा-या भाविकांची गर्दीमुळे शहराच्या आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होतो त्यामुळे शहरातील नागरीकांना व भाविकांना सेवासुविधा देत असताना सफाई कर्मचारी हा आपली सेवा प्रमाणिकपणे करत असतो. त्यामुळे जे सफाई कर्मचारी चांगेल काम करतात अशा कामगारांचा सत्कार होणे आवश्यक असल्याने या वर्षीपासुन सफाई कर्मचा-यांना आदर्श कामगार पुरस्कार देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे आज या सफाई कर्मचा-यांना आदर्श पुरस्कार देत असताना मला मनस्वी आनंद होत आहे. भविष्यात नगरपरिषदेमधील विभाग प्रमुख, लिपीक व शिपाई कर्मचा-यांनासुद्धा आदर्श कामगार देणार असल्याचे सांगितले व सर्व कामगारांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गटनेते गुरुदास अभ्यंकर, नगरसेविका रेणुका घोडके, शकुंतला नडगिरे, सुप्रिया डांगे, अनुसया शिरसट, नगरसेवक संजय निंबाळकर, विवेक परदेशी, नरसिंह शिंगण, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले तसेच नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी शरद कुलकर्णी, आरोग्य अधिकारी डॉ.संग्राम गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल जोशी, स्वच्छता निरीक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, मारुती मोरे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.