श्रीराम बडवे यांच्या वाढदिवसानिमित स्नेहमेळाव्याचे आयोजन....

​पंढरपूर ता २९: पंढरपूर येथे पंढरपूर फोटोग्राफर , व्हीडीओग्राफर संघ व हरिकृपा डिजीटल परीवार & फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष श्रीराम बडवे यांच्या वाढदिवसानिमित योच्या सयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या फोटोग्राफर स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी फोटोग्राफर यांच्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड , शॉप अक्ट लायसन्स आदी पुर्तता केली. कार्यकमासाठी माजी आमदार सुधाकर परिचारक , नगराध्यक्षा साधना भोसले , उपनगराध्यक्षा सुजाता बडवे , जनसंपर्क अधिकारी सुनिल वाळुजकर , मेडीकल ऑफीसर अनिल जोशी, नागेश कामत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एकपात्री विनोदी कलाकार मोहन शिंदे यांनी आपली कला सादर करून उपस्थितांचे वाहवा मिळवली. फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष श्रीराम बडवे यांच्या वाढदिवसानिमित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फोटोग्राफर विलास साळुखे, हेमंत भाळवणकर , उमेश टोमके , दिनेश शिळ्ळे, नागेश कामत , बंटी लव्हेकर , संतोष चव्हाण , उमेश ढोबळे , बापू कदम आसिफ शेख, नंदराज कारंडे, राहुल देशमाने , अमोल कवठाळकर आदीनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुसंचालन विलास साळुंखे यांनी केले तर उपस्थितांचे आभार उमेश टोमके यांनी मानले .