भगवान सर्वगोड आदर्श कामगार पुरस्कार प्रदान
कामगार दिनानिमित्त भगवान सर्वगोड यांना आदर्श कामगार पुरस्कार प्रधान करताना नगराध्यक्षा साधना भोसले, मुख्याधिकारी अभिजीत बापट.
पंढरपूर : महाराष्टÑ दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त पंढरपूर नगरपालिकेच्यावतीने भगवान सर्वगोड यांनाआदर्श कामगार पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे.
आदर्श कामगार पुरस्कारांचे वितरण मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या हस्ते करण्यात आले. भगवान तात्या सर्वगोड, अशोक काशीनाथ रणदिवे, गणपत छोटा सोलंखी, सविता पशा मेहडा, रंजना दत्तु वाघमारे, मीना सुरेश वाघेला यांना आर्दश पुरस्कार देण्यात आला आहे.
यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, उपनगराध्यक्षा सुजाता बडवे, शुंकुतला नडगिरे, माजी नगरसेवक नागेश भोसले, जनसंर्पक अधिकारी सुनिल वाळूजकर, रेणुका घोडके उपस्थित होते.