नाशकात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या.. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र अजूनही सुरूच..
नाशकात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या..
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र अजूनही सुरूच..
4 May. 2017
नाशिक – शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र अजूनही सुरूच आहे. जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली.
सुनील शांताराम देवरे व नितीन कडू बिरारी या दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. यात एका शेतकऱ्याने विष प्राशन केले तर एकाने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. कर्ज फेडण्यास अपयश येत असल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. लाखो रुपयांचे कर्ज शेतकरी सुनील देवरे यांच्या डोक्यावर होते, त्यातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या गारपीटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतात असलेली डाळिंबाची बाग खराब झाली म्हणून देवरे यांनी नैराश्यातून आपले जीवन संपवले.