महावितरण वेळापूर उपविभागाला उत्कृष्ठ उपविभाग पुरस्कार; मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांच्या हस्ते बारामती येथे झाला गौरव

महावितरण वेळापूर उपविभागाला उत्कृष्ठ उपविभाग पुरस्कार; मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांच्या हस्ते बारामती येथे झाला गौरव कोळेगाव,प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. मर्यादित बारामती परिमंडळ यांच्या वतीने १ मे कामगार दिनानिमित्त गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्काराचे वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सोलापूर मंडलमधून अकलूज विभागातील वेळापूर उपविभागाला उत्कृष्ठ उपविभाग पुरस्कार बारामती परिमंडलचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला.प्रमुख पाहुणे सोलापूर मंडळ चे अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर पडळकर होते.हा पुरस्कार अकलूज चे कार्यकारी अभियंता श्रीनिवास चटलावर,वेळापूर चे उपकार्यकारी अभियंता रवींद्र भुतडा,सहाय्यक अभियंता शरद मिसाळ,संतोष सुळ,विशाल पवार,रोहित राख यांनी स्वीकारला. तसेच वरीष्ठ तंत्रज्ञ जयंत पाठक यांना उत्कृष्ठ वरीष्ठ तंत्रज्ञ हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी दिलीप लोंढे ,सहाय्यक लेखापाल संतोष जाधव,गणेश जाधव,जयंत पाठक, राजेंद्रकुमार इंगोले,प्रसाद मिसाळ,रितेश शिरभाते उपस्थित होते. फोटो ओळी- बारामती -येथे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांच्या हस्ते महावितरण चा उत्कृष्ठ उपविभाग पुरस्कार स्वीकारताना उपकार्यकारी अभियंता रवींद्र भुतडा ,शरद मिसाळ,संतोष सुळ,विशाल पवार व इतर (छायाचित्र-शाहरुख मुलाणी)