सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या कर वसुलीबाबत सर्व नगराअध्यक्ष व मुख्याधिकारी यांची जिल्हाधिकारी समवेत आढावा बैठक... वसुली मोहिम तीव्र करुन थकीत मालमत्ताधारकावर दररोज २० जप्त्या करण्याचे आदेश...

सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या कर वसुलीबाबत सर्व नगराअध्यक्ष व मुख्याधिकारी यांची जिल्हाधिकारी समवेत आढावा बैठक... वसुली मोहिम तीव्र करुन थकीत मालमत्ताधारकावर दररोज २० जप्त्या करण्याचे आदेश..! Pandharpur Live 4 April 2017 शासनाने राज्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायती यांना दि.३१.०३.२०१७ पर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टी यांची १०० टक्के वसुली करणेबाबतचे आदेश दिले आहेत.तसेच ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषदेचे नगराअध्यक्ष व मुख्याधिकारी यांची संयुक्तीक बैठक घेवून वसुलीबाबत सुचना दिल्या होत्या त्यास अनुसरुन मा.जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदेचे नगराअध्यक्ष व मुख्याधिकारी यांची संयुक्तीक बैठक जिल्हाधिकारी यांच्या कक्षात जिल्हा प्रशासनाधिकारी डॉ पंकज जावळे,मुख्याधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराअध्यक्ष सौ.साधना नागेश भोसले,अक्कलकोट नगरपरिषदेच्या नगराअध्यक्षा शोभा शिवशरण खेडगी मैंदर्गी नगरपरिषदेचे नगराअध्यक्षा दिप्ती किरण केसुर, दुधनी नगरपरिषदेचे नगराअध्यक्ष भिमाशंकर इंगळे कुर्डुवाडीचे नगराअध्यक्ष समीर मुलाणी, मुख्याधिकारी आशीष लोकरे,कैलास केंद्रे, कैलास गावडे,पृथ्वीराज पाटील,शीला पाटील, मनोज देसाई, , नगरसेविका सुप्रिया डांगे,कर निरीक्षक सुनिल वाळुजकर,शरद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी सांगितले की शासनाने राज्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायती यांनी दि.३१.०३.२०१७ पर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टी यांची १०० टक्के वसुली करणेबाबतचे आदेश सर्व नगरपरिषदांना दिले आहेत.राज्यातील नागरीकरणाचा वेग वाढला असुन सध्या राज्यातील सुमारे ५० टक्के क्षेत्राचे नागरीकरण झाले आहे. वाढणा-या नागरीकरणामुळे येणा-या जबाबदा-या व कर्तव्य स्वत:च्या आर्थिक क्षमतेवर नगरपरिषदांनी पार पाडणे अपेक्षीत आहे. नागरी भागाच्या सुनियोजीत व संपन्न विकासासाठी लोकाभिमुख स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनाकडुन महत्वाची भुमीका बजावली जाते. राज्यातील स्थानिक संस्था आर्थिक दृष्ट्या स्वयंपुर्ण असाव्यात व स्वत:च्या आर्थिक क्षमतेवर त्यांनी नागरिकांना मुलभुत सेवा पुरवाव्यात हि रास्त अपेक्षा आहे. या अनुषंगाने आर्थिक सक्षमता अत्यंत महत्वाची आहे. तथापि सर्वसाधारणपणे शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, शहरातील सर्वसाधारण सामान्य नागरीक कराचा भरणा वेळेत करीत असतो. परंतु कांही नागरीक मालमत्ता कराची रक्कम भरणा करण्याचे टाळतात. आणि त्यामुळे सुमारे २० टक्के नागरीकांकडेच नगरपरिषदेकडे एकुण थकबाकीच्या ८० टक्के रक्कम प्रलंबीत असते. या प्रलंबित थकबाकींच्या वसुलीसाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. नागरी स्थानिक संस्थ्यांच्या मालमत्ता कराच्या रकमेची व थकबाकीची वसुली प्रभाविपणे झाल्यास त्यांचे आर्थिक सक्षमता वाढण्यास व पर्यायाने नागरीकांना मुलभुत सुविधा कार्यक्षमतेने उपलब्ध करुन देण्यास मदत होणार आहे. त्यासाठी कर वसुलीची मोहिम प्रभाविपणे राबविण्याच्या दृष्टीने संबंबधित नगरपरिषद / नगरपंचायतींच्या क्षेत्रातील मोठे थकबाकीदार निश्चित करण्यात यावेत व त्यांची यादी तयार करुन त्यांच्यापासुन थकबाकी वसुलीची मोहिम सुरु करण्यात यावी. यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखुन पुरेशी व वाजवी संधी देवुनही जे थकबाकीदार रक्कम देणार नाहीत अशा थकबाकीदाराची वसुली करणेकामी नगरपरिषदेतील कर्मचा-यांची विशेष वसुली-जप्ती पथके नेमुन जे थकबाकीदार कराची रक्कम भरणार नाहीत अशा मालमत्ता धारकांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करावीत. तसेच दररोज प्रत्येक वसुली पथकातील टिमने किमान २० जप्त्या कराव्यात या जप्त्या केल्यानंतर ५ दिवसाच्या आत थकबाकीची रक्कम नगरपरिषदेकडे जमा न झाल्यास त्या जंगम व स्थावर मालमत्तेची जाहिर लिलावाव्दारे विक्री करुन कराची रक्कम वसुल करावी तसेच या लिलाव प्रक्रीये मध्ये बोली न आल्यास म.न.प. अधिनियम १९६५ कलम १५६ अनुसार कार्यवाही करुन या थकीत मालमत्तेस नगरपरिषदेचे नाव लावण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा अशा सुचना या बैठकी मध्ये मुख्याधिकारी यानां दिल्या. कराची रक्कम वसुल झाल्यासच या शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होवून नागरिकांना चांगल्या सेवा सुविधा देता येणार आहेत.त्यामुळे नगराअध्यक्ष व पदाधिकारी यांनी वसुली कामी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी जिल्हा प्रशासनाधिकारी डॉ पंकज जावळे,मुख्याधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराअध्यक्ष सौ.साधना नागेश भोसले,अक्कलकोट नगरपरिषदेच्या नगराअध्यक्षा शोभा शिवशरण खेडगी मैंदर्गी नगरपरिषदेचे नगराअध्यक्षा दिप्ती किरण केसुर, कुर्डुवाडीचे नगराअध्यक्ष समीर मुलाणी, मुख्याधिकारी आशीष लोकरे,कैलास केंद्रे, कैलास गावडे,पृथ्वीराज पाटील,शीला पाटील, मनोज देसाई,दुधनी नगरपरिषदेचे नगराअध्यक्ष भिमाशंकर इंगळे, नगरसेविका सुप्रिया डांगे,कर निरीक्षक सुनिल वाळुजकर,शरद कुलकर्णी,हे उपस्थितीत होते.