पंढरपूर नगरपरिषदेला उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रथम क्रमांकाचे ३ कोटी बक्षिस देऊन पुरस्कार...
पंढरपूर नगरपरिषदेला उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रथम क्रमांकाचे ३ कोटी बक्षिस देऊन पुरस्कार...
Pandharpur Live 4 April
पंढरपूर नगरपरिषदेने केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे ३ कोटी बक्षिस देऊन पुरस्कार करण्यात आला.
पुणे विभागातील ब वर्ग नगरपरिषदामध्ये पंढरपूर नगरपरिषदेने सर्वोत्तम कामगिरी केल्याने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहिर करण्यात आला व आज मुंबई येथे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस याच्या शुभहस्ते उपनगराध्यक्ष सौ सुजाता त्र्यंबक बडवे व मुख्याधिकारी अभिजित बापट गटनेते अनिल अंभगराव गुरूदास अंभ्यकर पाणीपुरवठा विक्रम शिरसट नगरसेवक शकुंतला नडगिरे सुजित कुमार सर्वगोड यांना प्रथम क्रमांकाचे बक्षिस म्हणुन ३ कोटी रूपयाचा विशेष निधि पालिकेस देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील नागरिकरणाचा वाढता वेग लक्षात घेता राज्यातील सुमारे ५० टक्के क्षेत्र नागरीकरणात मोडत असल्याने वाढत्या नागरीकरण्यामुळे पडणा-या जबाबदा-या व कर्तव्य स्वतच्या आर्थिक क्षमतेवर नगरपरिषदेने पार पाडाव्यात व नागरी स्थानिक संस्था आर्थिक दृष्ट्या स्वंयपुर्ण व्हावेत व जनतेला चांगल्या मुलभुत सेवा सुविधा मिळाव्या ह्या हेतुने राज्यातील नगरपरिषदांचे कामाकाजाची माहीती घेऊन उल्लेखनिय कामगिरी करणा-या नगरपरिषदा यांचा राज्यस्तरावर उत्कृष्ठ म्हणुन गौरव करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता तसेच २० एप्रिल हा नगरविकास दिन म्हणुन जाहिर केला होता या अनुंषगाने नागरी स्थानिक संस्था करित असलेल्या कामाचे यथायोग्य मुल्यमापन करून. उत्कृष्ठ सेवा व कामगिरी बजावणा-या नागरी स्थानिक संस्थाचा गुणगौरव करण्याच्या दृष्टीकोनातुन पुणे विभागात येणा-या पाच जिल्हातील सर्व नगरपरिषदाची माहीती शासनाने मागविलेली होती त्यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता अभियान ,हागणदारी मुक्त शहर ,घनकचरा व्यवस्थापन ,प्लँस्टीक बंदी ,कर वसुली ,नागरी सेवा हक्क , प्रशासकिय कामकाज , कमी दराने निविदा देणे पाणीपुरवठा ,शासनाच्या विविध योजना राबविणे पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न व इतर विशेष बाबीचा आढावा घेण्यात आला होता .त्यानुसार पंढरपूर नगरपरिषदेने राज्यशासनाला अपेक्षित असलेली उत्कृष्ठ व उल्लेखनिय कामगिरी पार पाडल्याने आज पुणेविभागातील ब वर्ग नगरपरिषद मधुन पंढरपूर नगरपरिषदेस ३ कोटी रूपयाचे बक्षिस जाहिर करण्यात आले. पंढरपुर ही भारतीची दक्षिण काशी समजले जाते पंढरपुरामध्ये श्री विठ्ठल –रूक्मिनि च्या दर्शनासाठी संपुर्ण भारतातुन व परदेशातुन कोट्यावधी भाविक येत असतात प्रति वर्षी भरणा-या चार मोठ्या यात्रा व या निमित्ताने येणा-या भाविकांची संख्या व नगरपरिषेद यंत्रणेवर पडणारा आर्थिक , स्वच्छता पाणीपुरवठा व इतर ताण विचारात घेता नगरपरिषदेला नागरीक सुविधा पुरविण्यात अडचणी निर्माण होत असतात व अशा परिस्थितीत पंढरपूर नगरपरिषदेने नगराध्यक्ष सौ .साधनाताई नागेश भोसले उपनगराध्या सुजाता बडवे सर्व सभापती नगरसेवक यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी अभिजित बापट, प्रशासन अधिकारी शरद कुलकर्णी जनसंपर्क अधिकारी सुनिल वाळुजकर नगरअभियंता दिनेश शास्त्री पाणीपुरवठा अभियंता आत्माराम जाधव आरोग्याधिकारी डॉ.सग्रांम गायकवाड वैद्यकिय अधिकारी अनिल जोशी ,क.अभियंता मुकुंद जोशी ,धर्माण्णा गज्जाकोष ,अशोक भालेराव लेखापाल चिंदानंद कोळी या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार काम केल्याने हा पुरस्कार शासनाने जाहिर केला आहे. हा पुरस्कार मिळाल्याने नगरसेवक नागरीक व कर्मचा-यामध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले असुन अनेकांना फोन द्वारे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी याचे अभिनंदन केले आहे .