सेनेच्या माध्यमातुन तालुक्याचा विकास करा-उद्धव ठाकरे सर्वाधिक मते मिळविणार्‍या संभाजी शिंदे यांचा मुंबईत सत्कार

पंढरपूर,प्रतिनिधी
शिवसेनेन सदैव 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करुन सर्वसामान्यांची सेवा केली आहे.त्याचप्रमाणे ग्रामीण भागात कामे करुन पंचायत समितीच्या माध्यमातुन तालुक्याचा सर्वांगीण विकास करा याकरीता पक्ष व मी सदैव पाठीशी आहे. असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई येथील रंगशारदा सभागृहात बुधवारी राज्यातील जिल्हापरीषद व पंचायत समितीच्या सदस्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्यात आले होते.यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सह शिवसेनेच्या मंत्र्यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले. .यावेळी प्रशिक्षण शिबीर संपल्यानंतर पंढरपूर तालुक्यात पंचायत समितीच्या निवडणुकी सर्वाधीक मताधिक्याने निवडणुक आल्याबद्दल तालुकाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे यांचा उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी खा.संजय राऊत,खा.विनायक राऊत,खा.राहुल शेवाळे,पंढरपूर-मंगळवेढा पक्ष निरीक्षक संतोष माने आदी उपस्थित होत.संभाजी शिंदे हा माझा जूना व सच्चा शिवसैनिक असून अशा शिवसैनिकांचा मला अभिमान असल्याचे यावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले.