महाराष्ट्र दिनी आमदार भारत भालके यांच्या हस्ते तहसिल कार्यालयात ध्वजारोहण
महाराष्ट्र दिनी आमदार भारत भालके यांच्या हस्ते तहसिल कार्यालयात ध्वजारोहण
पंढरपूर दि.1:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय पंढरपूर आमदार भारत भालके यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
तहसिल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय ध्वजारोहण सोहळयास प्रांतधिकारी संजय तेली, तहसिलदार अनिल कारंडे, पंचायत समितीचे सभापती दिनकर नाईकनवरे,गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे, श्रीमती स्मिता सोनवणे, सहाय्यक गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, मंदीर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी स्वातंत्र्य सैनिक व नागरीक उपस्थित होते