कामगार दिनादिवशी विनावेतन प्रतिलिपीकांचे उपोषण
पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी साखळी उपोषणासाठी बसलेले विनावेतन प्रतिलिपीक रविंद्र शेंबडे व अनंता कुलकर्णी, सम्यक क्रांती मंच महाराष्टÑ प्रदेश अध्यक्ष प्रशांत लोंढे, सिध्दार्थ जाधव.
पंढरपूर : महाराष्टÑ व कामगार दिनादिवशीच विनावेतन प्रतिलीपाकांनी पंढरपूर तहसिल कार्यलयासमोर विविध मागण्यासाठी साखळी उपोषण केले आहे.
आम्हास नेमुण दिलेले काम करण्याबाबत बेकायदेशिरपणे केलेली तोंडी मनाई त्वरीत मागे घेवुण आम्हास पुर्ववत काम करु द्यावे. मे २००९ पासुनचा थकीत मेहताना (७० टक्के) त्वरीत मिळावा. या पूर्वी वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे १० वर्षे सलग सेवा करणाºया शासन सेवेत सामावून घेतलेले आहे. त्याच न्यायाने २० वर्षाहून अधिक कळ सेवेत असणाºया आम्हा विनावेतन प्रति लिपीकांना ासन सेवेत सामावुन घ्यावे. आमच्या उपरोक्त अन्य मागण्यसाठी जनता जनार्धनानी पाठींबा देवून शासनास जाब विचारावा या मागण्यासाठी विनावेतन प्रतिलिपीक रविंद्र शेंबडे, आनंत कुलकर्णी हे साखळी उपोषणासाठी बसले हाते. उपोषणाच्या ठिकाणी आ. भारत भालके, प्रांत अधिकारी संजय तेली, तहसिलदा अनिल कारंडे यांनी भेट दीली. यावेळी सम्यक क्रांती मंच महाराष्टÑ प्रदेश अध्यक्ष प्रशांत लोंढे, सिध्दार्थ जाधव, पप्पू झेंडे, पद्माकर सर्वगोड उपस्थित होते.
विनावेतन प्रतिलिपीकांना २० वर्ष काम करुन देखील त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे शासन सेवेत समाविष्ट करुन घेतले जात नाही. त्याचबरोबर त्यांना मेहताना देखील मिळाला नाही. यामुळे त्यांना त्वरीत न्याय न मिळाल्यास तिव्र आंदोलन करणार आहे.
- प्रशांत लोंढे
प्रदेश अध्यक्ष, सम्यक क्रांती मंच महाराष्टÑ