सर्पदंशाने 5 वर्षाच्या बालकाचा मृत्यू

सर्पदंशाने 5 वर्षाच्या बालकाचा मृत्यू 2 May. 2017
नाशिक – एका 5 वर्षीय शाळकरी मुलाचा सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली. साईकिरण मुथळ असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. राहत्या घराजवळ असलेल्या गोठ्यात खेळत असताना विषारी सापाने त्याला दंश केला. जवळ असलेल्या मामाच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच साईकिरणचा मृत्यू झाला. साप इतका विषारी होता की दंशानंतर अवघ्या 1 तासाच्या आत मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती साईकिरणच्या मामांनी दिली. एकुलता एक मुलाचा मृत्यू झाल्याने आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे आज साईकिरणचा शाळेत निकाल होता, निकाल घेवून घरी आल्यावर ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.