खा.राजु शेट्टी व आ.सदाभाऊ खोत यांची महाराणा प्रताप जयंती सोहळ्यास भेट
पंढरपूर (प्रतिनिधी):- महाराणा प्रताप यांच्या जयंती दिनी पंढरपूरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आलेले शेतकरी संघटनेचे नेते खा. राजु शेट्टी व नुतन आमदार सदाभाऊ खोत यांनी येथील स्टेशनरोडवरील तनपुरे महाराज मठासमोर आयोजित केलेल्या महाराणा प्रताप जयंती सोहळ्यास सदिच्छा भेट देऊन या राजपुताना महायोध्याला अभिवादन केले.
यावेळी त्यांचेसोबत वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर व भाजपाचे माजी शहराध्यक्ष दत्तासिंह रजपुत आदी उपस्थित होते.
यावेळी त्यांचेसोबत वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर व भाजपाचे माजी शहराध्यक्ष दत्तासिंह रजपुत आदी उपस्थित होते.