सर्वसामान्य पंढरपूरकर रस्त्यावर उतरविणार!- उमेश सासवडकर

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरकरांच्या सर्वसामान्य मागण्या पुर्ण करुन घेण्यासाठी आता सर्वसामान्य पंढरपूरकरांना रस्त्यावर उतरावे लागणार आणि स्वत: मी उतरविणार असल्याची माहिती माजी विद्यापीठ प्रतिनिधी उमेश जोतीराम सासवडकर यांनी दैनिक दामाजी एक्सप्रेसशी बोलताना दिली. सत्यशोधक युवा प्रतिष्ठान, पंढरपूर चे प्रवक्ते व सामाजिक कार्यकर्ते उमेश सासवडकर यांनी दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या पंढरपूर विभागीय कार्यालयास नुकतीच सदिच्छा भेट देऊन आपल्या आगामी काळातील राजकीय व सामाजिक कार्याची दिशा स्पष्ट करत विविध विषयावर सखोल चर्चा केली.

पुढे बोलताना सासवडकर म्हणाले, ‘‘एकदा मते मागुन गेलेला नेता सहसा पुन्हा भेटायला येत नाही. मग आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या मागण्याकडे लक्ष देण्यासाठी येथे वेळ कोणाला आहे? असा प्रश्‍न आता सर्वसामान्य पंढरपूरकरांना पडु लागला आहे. परंतु सर्वसामान्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी आणि सर्वसामान्य पंढरपूरकरांचे स्वत:हून नेतृत्व करुन आगामी काळात सर्वसामान्य पंढरपूरकरांसोबत रस्यावर उतरणार आहे. असे केल्याखेरीज सर्वसामान्य पंढरपूरकरांना न्याय मिळणार नाही.’’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या सोलापूर जिल्ह्यातील चढत्या आलेखाबाबत त्यांनी मुख्य संपादक दिगंबर भगरे यांचेसह संपुर्ण टीमचे अभिनंदन करत यापुढे दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या कोणत्याही कार्यास आवश्यक त्यावेळी सहकार्य करु असे अभिवचन दिले.