१० तारखेला प्रदर्शित झाला " माझी बायको माझी मेहुनि "
अनिल चौधरी
पुणे :-
पुंज फिल्म्स निर्मित एक धमाल कौटुंबिक चित्रपट येत आहे " माझी बायको माझी म्हेवणी" . अनेक पंजाबी चित्रपटांची यशस्वी निर्मिती केल्यानंतर आता मराठी चित्रपटाकडे वळणाऱ्या या संस्थेचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे . लहानपणीच लग्न ठरवल्या नंतर मोठेपणी तुम्ही दुसऱ्याच कोणाच्या तरी प्रेमात पडता आणि सुरु होतो इथेच खरा घोळ . रिंकी आणि पिंकी या दोन बहिणींची हि धमाल प्रेमकथा कशी रंगत जाते हे पाहताना हसून आपलीच पुरे वाट लागते. ह्या दोघींवर प्रेम करणाऱ्या दोन तरुणांचे लग्न त्याच बहिणीशी होते का ? अश्या अनेक घडामोडी पाहताना मजा येते.
कलाकार सुचित जाधव, सिया पाटील, नरेश बिडकर, प्रियांका भिडे, मिलिंद दास्ताने, डॉक्टर अविनाश उमप, डॉक्टर विलास उजवणे यांच्या हि महत्वाच्या भूमिका आहेत. निर्माता व दिग्दर्शक दीपक शर्मा, संगीत सोनू अजमेरी , व गीतकार के. रविराज , मनीषा शिरोळे, संतोष दरेकर .