सीबीएससी बोर्डात यश मिळविलेल्या श्रध्दाचे पंढरपूर लाईव्ह व दै.दामाजी एक्सप्रेस च्या वतीने अभिनंदन!
पंढरपूर (प्रतिनिधी):-
दहावी सीबीएससी बोर्डाच्या परीक्षेत पंढरपूर तालुक्यातील कासेगावची सुकन्या कु. श्रध्दा बाळासाहेब देशमुख हिने 95.40% गुण मिळवून नेत्रदिपक कामगिरी केल्याबद्दल तिचा दै.दामाजी एक्सप्रेस च्या पंढरपूर विभागीय कार्यालयात तिचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी दै.दामाजी एक्सप्रेस चे पंढरपूर विभाग प्रमुख भगवान वानखेडे व पंढरपूर लाईव्ह च्या कार्य. संपादिका कु.शुभांगी वाघमारे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन श्रध्दाला पुढील शैक्षणिक यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कु.श्रध्दा चे वडील बाळासाहेब देशमुख, प्रतिनिधी महेश दांडगे आदी प्रमुख उपस्थित होते.
‘‘श्रध्दाने मिळविलेले यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चीतच प्रेरणा देणारे असे आहे. श्रध्दाला व तिच्यासारख्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे हा सत्काराचा उद्देश असून दै.दामाजी एक्सप्रेस कायमच गुणवंतांच्या पाठीशी असतो.’’ असे मत यावेळी भगवान वानखेडे यांनी व्यक्त केले. ‘‘सीबीएससी चा अभ्यासक्रम हा प्रारंभी थोडा कठीण वाटतो मात्र कालाओघात त्या अभ्यासाची गोडी वाटु लागते. उच्चशिक्षणातील अभ्यासक्रम सीबीएससीमुळे सुलभ जातो.’’ असे मनोगत यावेळी श्रध्दाने व्यक्त केले. यावेळी श्रध्दाचे पिता बाळासाहेब देशमुख यांनी दै.दामाजी एक्सप्रेस च्या पंढरपूर विभागातील कार्याचे कौतुक करुन आभार मानले.