भाजपाच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी श्रीकांत बागल यांची निवड
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष शहाजी पवार म्हणाले की, अतिशय कमी वयामध्ये श्रीकांत बागल यांच्यावर केंद्रात व राज्यात पक्ष असलेल्या भाजपाच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी पडली आहे. सत्ताधारी पक्षाचे अध्यक्षपद हे काटेरी मुकूटासारखे असते. सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी धावून जात असताना पक्ष आपल्या पाठीशी उभा राहील. यापुढे पंढरपूर तालुक्यातील पंचायत समिती हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन श्रीकांत बागल यांनी काम करावे. आगामी पंचायत समिती निवडणुकीनंतर पंढरपूर तालुक्याचा पंचायत समितीचा सभापती भाजपाचा करण्यासाठी बागल यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी केले.
सोलापूर येथील लोकमंगल बँकेच्या वरील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी सद्गुरु साखर कारखान्याचे संचालक मोहन बागल, गादेगाव विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष पद्माकर बागल, महादेव ङ्गाटे, माजी सरपंच भारत बागल, ग्रा.पं. सदस्य पोपटनाना बागल, ग्रा.पं. सदस्य गणेश बागल (गादेगाव), पंडीत बागल, शशिकांत माने, धनाजी मस्के, प्रगतशील बागायतदार तुकाराम नागणे, मोहन हुंडेकरी, रामदास गिड्डे, अंकुश गव्हाणे, नवनाथ बागल, अरविंद बागल, वसंत केदार, सदाशिव वाघमारे, रावसाहेब पवार, राजू शिंदे, सुरेश मोरे, (मुंढेवाडी), आबा महाडीक (पुळूज), चंद्रकांत शिंदे (भाळवणी), पांडुरंग यलमार (भंडीशेगाव), आनंद देशपांडे (भाळवणी), राजकुमार गायकवाड (चळे), रवींद्र कोळी (कासेगाव), शिवाजी चंदनशिवे (लक्ष्मी टाकळी) व भाजपाचे माजी पंढरपूर शहराध्यक्ष दत्तासिंह रजपुत, आदी मान्यवरांसह बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यात भाजपा वाढीसाठी प्रयत्न करणार-श्रीकांत बागल
भाजपा च्या जिल्ह्यातील पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करुन दाखवु. पंढरपूर तालुक्यात भाजपा पक्ष वाढीसाठी अविरतपणे प्रयत्न करु. पंढरपूर तालुक्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांची मजबुत ङ्गळी निर्माण करु. आगामी पंचायत समिती निवडणुकीत भाजपा पक्षाची सत्ता येणे हे उद्दीष्ट डोळ्यासमोर आहे. प्रत्येक गावात भाजापाची शाखा उघडून सदस्यनोंदणी वेगाने करु. भाजपाच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पदाधिकार्यांशी समन्वय राखुन कार्य करु. येणार्या सर्व निवडणुका या भाजपाच्या कमळ या चिन्हांतर्गत लढवून जिंकून दाखवु. असे मत पंढरपूर भाजपाचे नुतन तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. येथील लक्ष्मी पॅलेस येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पंढरपूर तालुक्यातील भाजपासोबतच्या आपल्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली. यावेळी त्यांचेसोबत भाजपाचे माजी शहराध्यक्ष दत्तासिंह रजपुत व कार्यकर्ते उपस्थित होते.