माढ्यातील रोकडोबा मंदीरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाची सुरूवात

माढ्यातील रोकडोबा मंदीरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाची सुरूवात

माढा (प्रतिनिधी )

माढ्यातील रोकडोबा मंदीर कार्यकारी मंडळाचे वतीने संत किसनदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाची सुरूवात आज रविवार दिनांक 19 पासून झाली आहे.
    मंगळवार पेठ साठे गल्ली येथे संपन्न होत असलेल्या या हरिनाम सप्ताहाचे व्यासपीठ संचलन ह भ प  नागनाथ कौलगे महाराज करीत आहेत.यामध्ये पहाटे चार ते सहा काकडा आरती , सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण ,दुपारी बारा ते एक पर्यत गाथा भजन , दुपारी दीड ते साडेतीन भोजन व विश्रांती सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ , सायंकाळी सहा ते सात प्रवचन , रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत हरिकिर्तन   ,व रात्री साडेअकरा नंतर हरीजागर असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
     सदर कार्यक्रम हे आज रविवार पासून सोमवार दिनांक 27 जून पर्यत सलग नऊ दिवस होणार आहेत. यामध्ये डॉ अनंत बिडवे बार्शी , प्रा राजेंद्र दास , डॉ जयंत करंदीकर यांच्या प्रवचनासह नामवंत किर्तनकारांचे कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
    आज   रविवारी सकाळी होमपूजन कुर्मदास साखर कारखान्याचे   संचालक दादासाहेब साठे यांच्या हस्ते तर ध्वज पूजन वैजिनाथ राऊत यांच्या हस्ते तर विणा पूजन संजय गायकवाड यांचे हस्ते करून सप्ताहाची सुरूवात करण्यात आली.
   रविवार दिनांक 26 रोजी दिंडी मिरवणूकीनंतर  उद्योजक अजिनाथ माळी व शरद घोलप यांचेवतीने  महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
    हा सोहळा यशस्वी होण्यासाठी बद्रीनाथ रोटे ,संजय गायकवाड ,भागवत शहाणे ,महादेव शेळके , संदीप साठे , भिमराव राऊत , दिलीप साठे आदि परिश्रम घेत आहेत.