उमेश सासवडकर यांचे नेतृत्व सर्वसामान्यांसोबत :- सत्यशोधक

उमेश सासवडकर यांचे नेतृत्व सर्वसामान्यांसोबत :- सत्यशोधक

पंढरपूर प्रतिनिधि :- सामाजिक जान आणि सामाजिक भान असणारे शिवाय सर्वसामान्यांसोबत असणारे नेतृत्व म्हणुन उमेश जोतिराम सासवडकर यांचा उल्लेख करणे योग्य ठरेल.अशी भावना पंढरपूर मधील सत्यशोधक युवा प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.निमित्त होते,गोरगरीब, होतकरु विद्यार्थीनींना मदत करण्याचे. हि मदत सत्यशोधक युवा प्रतिष्ठान चे प्रवक्ते उमेश सासवडकर यांच्या "लढा विचारांचा विचारांशी" या काव्यसंग्रहाच्या विक्रीमधुन जो पैसा प्राप्त झाला. त्याव्दारे करण्यात आल्याची माहिती सत्यशोधक प्रतिष्ठानचे सदस्य महेश देवमारे यांनी दिली.

पंढरपूर शहर व तालुक्यातील एकुन अकरा मुलींना या मदतीचा लाभ देण्यात आला.यावेळी प्रतिष्ठान चे ओंकार पवार,विकास माळी,सोमनाथ बागल,दिगंबर देवमारे, रेवन देवमारे, तेजस शेलार,अनमोल पवार, सोमनाथ देवमारे, समाधान बनकर, ज्ञानेश्वर बनसोडे, रोहित माळी आदि सदस्य उपस्थित होते.