बॉम्बशोधक पथकासह पोलिस अधिकार्यांकडून पंढरपूर रेल्वेस्थानकावर आपत्कालीन स्थितीचा आढावा
पंढरपूर (प्रतिनिधीे):- आज रात्री आठ वाजण्याचा सुमारास पंढरपूर येथील रेल्वेस्थानकात पोलिस प्रशासनासह ङ्गायर ब्रिगेड, प्रथमोपचार अॅम्ब्युलन्ससह बॉम्ब डिस्पोजेबल पथक (बीडीडीएस) यांसह मोठा ङ्गौजङ्गाटा दाखल झाला. या सर्वांनी पंढरपूर रेल्वे स्थानकावर आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास सर्व प्रशासकीय यंत्रणा सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी तत्पर असेल का? याचा आढावा घेतला. दरम्यान महिन्यातून एकदा येणारी ‘भारत दर्शन’ ही यात्रा स्पेशल रेल्वे शिर्डीहून पंढरपूरला दर्शनासाठी थांबली होती. याचवेळी सर्व ङ्गौजङ्गाटा भारत दर्शन रेल्वेची तपासणी करु लागला. बॉम्बशोधक पथकाच्या तपासणीमुळे रेल्वेस्थानकातील प्रवाशांमध्ये एकच धांदल उडाली. मात्र प्रशासन यंत्रणेची बॉम्बशोधक बाबतची ही ट्रायल असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी मोकळा श्वास घेतला.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभुमीवर अतिरिक्त पोलिस अधिकारी मनिषा डुबूले यांचेसह मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी जगदाळे, पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नावंदे, तालुका पो.निरीक्षक के.के.खराडे यांचेसह पोलिस कर्मचार्यांचा ङ्गौजङ्गाटा रेल्वेस्थानकात दाखल झाला. यावेळी बेळगाव-पंढरपूर गाडीसाठी प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्लॅटङ्गॉर्म क्र. 2 वर यात्रा स्पेशल ही भारत दर्शन रेल्वे थांबली होती. या गाडीची तपासणी बॉम्बशोधक व बॉम्बनिकामी पथकाचे अधिकार्यांसह, डॉगस् स्कॉड युनिटद्वारे सुरु झाली. प्रवाशांमध्ये यावेळी घबराहट निर्माण झाली. प्रवाशांना काहिही समजेना व सुचेना झाले. त्यांना शांत करण्यासाठी सुचना देणार्या स्पीकर्सना शोधण्यासाठी अधिकार्यांचे 10 मिनीटे वाया गेले. तोपर्यंत फ्लॅट ङ्गॉर्म क्र. 1 वर थांबलेले प्रवाशांंमध्ये धांदल उडाली तर भारतदर्शन रेल्वेतील प्रवाशी भाविकही भयभीत झाले. परंतु याठिकाणी डॉग स्कॉड पथकाला तपासणी करुनही आक्षेपार्ह असे काहिही मिळुन आले नाही. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ङ्गायर ब्रिगेडचे अॅम्ब्युलन्स सर्वात अगोदर रेल्वे स्थानकावर दाखल झाली. पाठोपाठ प्रथमोपचार अॅम्ब्युलन्स दाखल झाली. परंतु कोणताही अनुचित प्रकार किंवा आक्षेपार्ह वस्तु असे काही मिळुन न आल्याने अधिकार्यांनी व उपस्थित प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
या घटनेची माहिती देताना अतिरिक्त पोलिस अधिकारी मनिषा डुबूले म्हणाल्या की, ‘‘आषाढी यात्रेच्या पार्श्वभुमीवर नेहमीच शहरातील गजबजलेल्या ठिकाणी अशा प्रकारचा डेमो प्रशासनाकडून घेतला जातो. या डेमोसाठी प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी वेळेवर पोहोचले. परंतु महसुल खात्याचे कर्मचारी व तहसिलदार हे अनुपस्थितीत होते. त्यांचा दुरध्वनी क्रमांक व मोबाईलही नॉट रिचेबल लागत असल्याने महत्वपुर्ण जबाबदारी असणार्या अशा अधिकार्याकडून ही अपेक्षा नसल्याची चर्चा उपस्थितांकडून होत होती. याचबरोबर तपास कामामुळे गोंधळून गेलेल्या प्रवाशांना शांत करण्याचे आवाहन करण्यासाठी असलेली यंत्रणा कुचकामी दिसून आली. याबद्दल या दोन्ही खात्यांमधील वरिष्ठांना रिपोर्ट पाठविणार असल्याचे डुबूले मॅडम यांनी सांगितले. या डेमोने प्रशासन यंत्रणा किती प्रमाणात कार्यतत्पर आहे. याची पडताळणी झाली. यावेळी तपासणी चालु असल्यामुळे मिरज-परळी (22146) ही गाडी अर्धा तास सांगोला येथे रोखण्यात आली.