पंढरपूर शहर पोलिसांकडून मोटारसायकल चोरणारी टोळी गजाआड
पंढरपूर (प्रतिनिधी):-
पंढरपूर शहर पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरी करणार्या टोळीला गजाआड केले.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नावंदे व पोसई शेख यांनी पंर्ढपूर, मंगळवेढा, अकलुज, सांगोला येथील मोटारसायकल चोरी करणारे हणुमंत तानाजी देवकर (21), रा. परिचारक नगर, पंढरपूर, आण्णा उर्ङ्ग अनिल भिमराव घोडके (21), रा. ङ्गुट रस्ता, कोर्टी, ता.पंढरपूर, अक्षय राम काळे (21), कुंभार गल्ली, पंढरपूर यांना अटक करुन त्यांचेकडे विचारपुस केली असता पंढरपूर, मंगळवेढा, अकलुज, सांगोला येथील चोरी केलेल्या आत्तापर्यंतच्या 10 मोटारसायकली आरोपनिी पोलिसांच्या ताब्यात देत या मोटारसायकली वरील ठिकाणाहून चोरुन आणल्याची कबुली शहर पोलिसांकडे केली आहे.
मिळून आलेल्या मोटारसायकलीमध्ये 8 हिरो होंडा स्पलेंडर, 1 टीव्हीएस स्टार, 1 होंडा शाईन, अशा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. आरोपींकडे चौकशी केल्यास आणखी मोटारसायकली मिळण्याची शक्यता आहे. सदर आरोपी हे सराईत आहेत. मोटारसायकली चोरी करुन त्यांची विक्री करतात व त्यातून आलेल्या पैशातून मौजमजा करतात असे तपासात सांगितले आहे. सदर गुन्हा उघडकीस आणणे करीता गुन्हे उघड करणेकरीता वरिष्ठ किशॅर नावंदे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक रियाज शेख व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी पो हेड कॉ. सुजित उबाळे, पोना. राहुल रणनवरे, पोना. सचिन गवळी, पोना. महिबुब शेख, पोना. गणेश पवार, पो.ना. मच्छिंद्र राजगे, पोकॉ. केशव सुर्वे आदी परिश्रम घेत आहेत. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोना. राहुल रणनवरे हे करीत आहेत.