अखेर नाथाभाऊंनी दिला राजीनामा... माझ्यावर आरोप करणारांनी अदयाप कोणतेच पुरावे सादर केले नाहीत! - एकनाथ खडसे

अखेर नाथाभाऊंनी दिला राजीनामा... माझ्यावर आरोप करणारांनी अदयाप कोणतेच पुरावे सादर केले नाहीत! - एकनाथ  खडसे

महाराष्ट्र Live News

अखेर आज महसुल व कृषीमंत्री एकनाथ  खडसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा नुकताच मुख्यमंत्री फडणवीस यांचकडे सादर केला.

भाजपाच्या वतीने यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खडसेंनी आपली भुमीका स्पष्ट  केली. 

माझ्यावर  केलेले आरोप हे तथ्यहीन असून  आरोप करणारांनी  याबाबत कोणतेही पुरावे  सादर केलेले नाहीत. माझ्या 40 वर्षाच्या राजकीय  कारकिर्दीत मी अशी मिडीया ट्रायल प्रथमच अनुभवली.  नैतीकतेच्या मुद्यावर मी राजीनामा  देत आहे.  जोपर्यंत मी स्वत:ला निर्दोष सिध्द करत नाही तोपर्यंत मी कोणत्याही पदावर रहाणार नाही.

असे नाथाभाऊंनी स्पष्ट  केले.