7 वर्षाच्या अब्रारचा रोजा उपवास
पंढरपुर ( आतार) - पंढरीतील अब्रार शब्बीर तांबोळी या 7 वर्षाच्या मुलाने रोजा चा एक दिवशीय उपवास धरला व त्याचे सर्व नियमांचे पालनही केले.
मुस्लिम बांधवांचा पवित्र ‘रोजा’ उपवास सुरु झाला असून हा संपुर्ण महिनाभर अनेक मुस्लिम बंधु-भगिणी कडक असा रोजाचा उपवास धरतात. उपवास काळात अन्न-पाणी वर्ज्य असते. पाण्याचा एक थेंबही प्यायचा नसतो. असा हा रोजा चा एक दिवसाचा उपवास येथील टाकळी रोड येथे रहाणार्या अब्रार शब्बीर तांबोळी या 7 वर्षाच्या मुलाने धरला. टाकळी रोडवरील दारुलउलम सुङ्गीया मदरसा मध्ये अब्रार याने सर्व नियमांचे पालन करत सर्वांच्या कल्याणासाठी अल्लाहकडे दुवा मागितली.