पंढरीत राष्ट्रवादीचा 17 वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा

पंढरपूर (प्रतिनिधी):- राष्ट्रवादीच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस पंढरपूर शहरच्या वतीने भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले. राष्ट्रवादी पक्षाचे विचार तळागाळात पोहचविण्यासाठी आज पंढरपूर शहरात सकाळी 10 वा.10 मिनीटांनी पक्षाच्या झेंड्याचे ध्वजारोहण, शहरातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार व पंढरीतील विविध ठिकाणी 14 शाखांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष सुभाषराव भोसले यांच्या हस्ते पक्षाच्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. तसेच जेष्ठ नागरिकांचा सत्कार सुधीरकाका भोसले, राष्ट्रवादी युवक चे शहराध्यक्ष संदिप मांडवे, राष्ट्रवादी विद्यार्थी महाराष्ट्र सरचिटणीस संकेत ढवळे, दिगंबर सुडके, पै.दत्तात्रय तारापूरकर, पै.अनिल अभंगराव, महंमद उस्ताद, गुलाब मुलाणी, सलीम मुलाणी रशीद शेख, सुभाष हुंगे-पाटील, भाई किशोर भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शहरातील विविध ठिकाणच्या शाखांचे उद्घाटन युवकचे जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर मासाळ, युवकचे कार्याध्यक्ष आप्पा थिटे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सुरजनाना भोसले, सुमत शिंदे, शंकर सुरवसे, युवराज भोसले, बंडू चव्हाण, सुहास म्हमाणे, भास्कर जगताप, निलेश कोरके, विजय मोरे, आण्णा सलगर, ॠषिकेश पवार आदित्य तारे, अजित मोरे, सागर कदम, सागर चव्हाण, सोपानकाका देशमुख, आण्णा लटके, सुनिल राऊत, एस.पी.गायकवाड, स्वप्नील गायकवाड, बंटी वाघ, मुजप्ङ्गर इनामदार, गणेश बनसोडे, संकेत घोगरदरे, जोतीनाथ जोशी, महेश मलपे, किरण मोहिते, अक्षय वनारे, बााळासाहेब महाडिक, सागर पांढरे, कुंदन अभंगराव, सुजित अभंगराव यांसह शहरातील राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.