राष्ट्रपिता महात्मा गांधींचे नातू पत्नीसोबत वृद्धाश्रमात जगतायत हलाखीत जीवन


नवी दिल्ली, दि. 16 - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू कनू भाई आपल्या पत्नीसोबत वृद्धाश्रमात राहत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणा-या महात्मा गांधींच्या नातवावर हलाखीत जीवन जगण्याची वेळ आली आहे. केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी कनू भाई राहत असलेल्या वृद्धाश्रमाला भेट देऊन त्यांची विचारपूस केली. कनू भाई महात्मा गांधींचे तिसरे पुत्र रामदास यांचे एकुलते एक पुत्र आहेत. 
यावेळी कनू भाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरुन संवाद साधला. दोघांनीही गुजरातीमध्ये एकमेकांशी बोलणं केलं. गुजरात आणि साबरमती आश्रम गांधींच्या आदर्शांवर चालत नसल्याची खंत कनू गांधी यांनी यावेळी व्यक्त केली. मी पंतप्रधानांची खुप जूना भक्त आहे, मी त्यांना जी मदत केली ती सर्व त्यांच्या लक्षात आहे. सोनिया गांधी माझ्या आणि मोदींच्या विरोधात होत्या अशी आठवणही यावेळी त्यांनी सांगितली. तसंच मी आनंदी होती आणि आताही आनंदी असल्याचं मनू गांधी बोलले आहेत. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला वृद्धाश्रमाला भेट देण्याचे तसंच कनूभाई यांच्या गरजा आणि अपेक्षांची विचारपूस करुन अहवाल तयार करण्यास सांगितलं असल्याचं महेश शर्मा यांनी सांगितलं आहे.