मच्छीमार नौकांसाठी जलशुद्धीकरण प्रकल्पवेसावकरांच्या ३५0 नौकांना मिळाला लाभ : वेसावे येथील बाजार गल्ली कोळी जमात संस्थेचा उपक्रम
मुंबई-राज्यात असलेला पाण्याचा भीषण दुष्काळ आणि मुंबई महानगरपालिकेने मुंबईत
केलेली पाणीकपात यांच्या कातरीत मुंबईतील मच्छीमार समाज सापडला आहे.
त्यामुळे खोल समुद्रात जाणार्या मच्छीमार नौकांना पाणीपुरवठा करणे ही
मच्छीमारांची मोठी समस्या बनली आहे. यावर मात करत वेसावे कोळीवाड्यातील
बाजार गल्ली कोळी जमात संस्थेच्या सुमारे ४५0 सभासदांनी एकमताने निर्णय
घेऊन आणि सामाजिक बांधिलकी जपत नाममात्र दरात वेसावे समुद्रकिनारी
वेसावकरांना आधारवड ठरणारा आणि राज्यातील समुद्रकिनारी असलेला पहिलाच
जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केला आहे. रोज २४ तास हा जलशुद्धप्रकल्प सुरू
असतो आणि येथील मच्छीमार बांधवांनादेखील यामुळे रोजगार मिळाला आहे. येथील
मच्छीमार नौकांसाठी गरजेनुसार या प्रकल्पातून शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले
जात आहे.
या प्रकल्पातून शुद्धीकरण केलेले पाणी थेट समुद्रकिनारी शाकारलेल्या मच्छीमार नौकांच्या पाण्याच्या कॅनमध्ये भरल्यामुळे मच्छीमारांची दमछाक थांबली आहे. मासेमारीसाठी जाणार्या २0 ते २२ मच्छीमार नौकांना या प्रकल्पाचा लाभ होत आहे.
समुद्रकिनारी बाजारगल्लीजवळ १५ बाय १२च्या केबिनमध्ये सुमारे २0 फुटी एक कूपनलिका बांधण्यात आली आहे. त्यामधून अद्ययावत जलशुद्धीकरण यंत्राद्वारे एका तासाला सुमारे ४५00 हजार लीटर पाणी तयार होते. येथील ५ हजार लीटरच्या टाक्यांमध्ये हे पाणी साठवले जाते. त्यामध्ये शुद्ध पाण्याचे प्रमाण सुमारे ३000 लीटर इतके असते. टाकाऊ पाणी येथील समुद्रकिनार्यावरील सध्या सुरू असलेल्या मत्स्यविभागाच्या चौथर्याच्या कामासाठी व अन्य बांधकामासाठी वापरले जाते. मढच्या मच्छीमार नौकादेखील येथील शुद्ध पाण्याचा लाभ घेतात. तर येथील गरजू नागरिकांना वापरण्यासाठी आणि लग्नसराईसाठी सामाजिक बांधिलकी जपत मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो, अशी माहिती बाजार गल्ली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष पराग भावे यांनी दिली. पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि येथील स्थानिक नगरसेवक यशोधर (शैलेश) फणसे यांचे सहकार्य मिळाल्याचे भावे यांनी सांगितले. मच्छीमारांची दमछाक थांबली र८ेु'>च्/र८ेु'>केरळनंतर मासेमारीत वेसावे कोळीवाड्याचा दुसरा क्रमांक लागतो. येथील सुमारे ३५0 मच्छीमार नौका सुमारे ८-१0-१२ दिवसांच्या मासेमारीसाठी खोल समुद्रात जातात. र८ेु'>
च्/र८ेु'>या प्रकल्पातून शुद्धीकरण केलेले एका बोटीला लागणारे सुमारे १000 ते १५00 लीटर पाणी थेट समुद्रकिनारी शाकारलेल्या मच्छीमार नौकांच्या पाण्याच्या कॅनमध्ये भरले जात असल्यामुळे येथील मच्छीमारांची पाणी नौकेमध्ये वाहून नेण्यासाठी होणारी मोठी दमछाक थांबली आह. अतुल का