सुरेश रैना 'बाबा' झाला
अॅमस्टरडॅम,
दि. १६ - भारताचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना बाबा झाला आहे. रैनाची
पत्नी प्रियांका चौधरीने हॉलंडची राजधानी अॅमस्टरडॅम येथीस हॉलंडची राजधानी अॅमस्टरडॅम येथीस रुग्णालयात रविवारी एका सुंदर कन्यारत्नाला जन्म दिला. ग्रेशिया असे त्यांनी मुलीचे नामकरण केले आहे.
१० मे रोजी रैना आयपीएलमधून विश्रांती
घेऊन पत्नीला भेटण्यासाठी अॅमस्टरडॅमला रवाना झाला होता. २९ वर्षांचा रैना
सध्या गुजरात लायन्सचा कर्णधार आहे. नऊ वर्षात प्रथमच तो आयपीएलच्या
सामन्याला मुकला.
पेशाने आयटी प्रोफेशनल असणा-या
प्रियांका चौधरी बरोबर मागच्यावर्षी रैनाचा विवाह झाला. प्रियांक
अॅमस्टरडॅममधल्या बँकेत नोकरीला आहे. रैनाने टि्वटरवरुन मुली आणि
पत्नीबरोबरचा फोटो शेअर करताना आनंद व्यक्त केला आहे.