अन्नाच्या शोधात हजारो किलोमीटरवर स्थलांतर
सोलापूर - पाणवठे आणि रानावनात दिसणारे सुंदर पक्षी आपले
लक्ष वेधून घेतात. फ्लेमिंगो, रोझी स्टर्लिंग, डेमोसिल क्रेन यांसारख्या
पक्ष्यांच्या हालचाली पाहताना आपण हरवून जातो. बदलणाऱ्या ऋतुचक्रात स्वत:चे
संरक्षण करण्यासाठी आणि अन्नाच्या शोधात हजारो किलोमीटरचा प्रवास करून
येणाऱ्या पक्ष्यांची दुनियाच निराळी आहे.
परदेशातून भारतात जे पक्षी स्थलांतर करतात त्यांचे आपल्याकडे वास्तव्य साधारण सप्टेंबर ते मार्च-एप्रिलपर्यंत असते. त्यानंतर येथील वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे ते येथून परत थंड हवेच्या दिशेने निघून जातात. भारतात आढळणारे स्थलांतरित पक्षी मुख्यतः मध्य आशिया, युरोप, कझाकिस्तान, सैबेरिया येथून येत असतात. पक्षी अभ्यासकांच्या मते वाढते प्रदूषण, पाणवठ्यांची दुरवस्था यामुळे अलीकडे पक्ष्यांच्या स्थलांतराचे प्रमाण तुलनेने कमी होत आहे.
का होते स्थलांतर?
गोठवणाऱ्या थंडीपासून सुटका मिळविण्यासाठी अनेक जातींचे पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करून उष्ण कटिबंधीय प्रदेशात साधारण दोन महिन्यांकरिता येतात. स्थलांतराचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, थंडीमुळे पाणवठे गोठल्यामुळे पुरेसे अन्न उपलब्ध होत नाही. अन्नाच्या शोधात पक्षी स्थलांतर करून एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जातात.
जिल्ह्यातील पक्षी निरीक्षणाची ठिकाणे -
संभाजी तलाव परिसर, स्मृती उद्यान, हिप्परगा तलाव, होटगी तलाव, आष्टी तलाव, उजनी जलाशय.
स्थलांतर करून येणारे पक्षी
फ्लेमिंगो, रोझी स्टर्लिंग, डेमोसिल क्रेन, बार हेडेड गुझ, ग्रे लॅग गुझ, रडी शेल्डक, व्हिसलिंग डक, युरोपियन रोलर, कोंब डक, रफ, कॉमन टेल, नॉर्थन पिंटेल, वूड सॅंडपिपर.