सर्वांगीण विकासासाठी चतुरस्र वाचन करणे गरजेचे:- कवी रवि वसंत सोनार

पंढरपूर LIVE 31 जानेवारी 2019                 

             
पंढरपूर (प्रतिनिधी) :- “जीवनामध्ये सर्वांगीण विकास साधायचा असेल तर चतुरस्त्र वाचन करणे गरजेचे आहे.” असे मत येथील विश्वविक्रमी  कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील वाचन कट्टा परिवाराच्या 'वाचाल तर वाचाल' या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले  “ज्यांना ज्यांना वैविध्यपूर्ण वाचन करून आपल्या जीवनामध्ये प्रगती साधता आली त्यांनीही वाचन संस्कृती पुढे चालावी म्हणून वाचनाचे महत्त्व इतरांना सांगितले पाहिजे. आणि त्यायोगे चळवळ पुढे नेली पाहिजे. ज्यायोगे प्रत्येक व्यक्तीच्या विकासाबरोबरच आपल्या देशाचा विकास होईल.”
          




वाचन कट्टाच्या या 'वाचाल तर वाचाल' कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धीरज साळुंखे हे होते. तर सौ. विनया पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी  कवी रवि सोनार  यांनी वाचन कट्टा परिवाराच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना व मार्गदर्शन करताना  कवितांचे वाचन व गायन केले. तर  महाविद्यालयाचे विद्यार्थी  दुर्गेश काळुंके  आणि  ऐश्वर्या थिटे यांनी  आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  शुभांगी लाळगे यांनी, पाहुण्यांचा परिचय ऋतूजा भोसले यांनी व सूत्रसंचालन मोनाली सलगर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रियांका शिखरे यांनी व्यक्त केले. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील वाचन कट्टा परिवाराच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.          





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com