वनसंरक्षणासाठी मध्यवर्ती सॅटेलाइट कमांड कंट्रोल रूम
पंढरपूर - पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वनविभागाच्या
वतीने येत्या १ जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधत एकाच दिवशी राज्यभरात
सुमारे विविध जातींच्या दोन कोटी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. वनातील
अनधिकृत वृक्षतोड रोखण्यासाठी नागपूर येथे मध्यवर्ती सॅटेलाइट कमांड
कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे, अशी माहिती राज्य वनविभागाचे मुख्य सचिव
विकास खार्गे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. ते पंढरपुरात तुळशी वृंदावन
लागवड पाहणीसाठी आले होते.
श्री. खार्गे म्हणाले, की सध्या तापमानवाढीचा प्राणी, पक्षी आणि मानवजातीवर मोठा परिणाम दिसू लागला आहे. पर्यावरण संतुलन कायम राखण्यासाठी राज्य वनविभागाने ‘हरित महाराष्ट्र’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सर्व शासकीय विभागांसह लोकसहभागातूनही वृक्षलागवड करण्यात येणार आहे. प्रादेशिक हवामान आणि पाण्याची उपलब्धता याचा विचार करून विविध जातींच्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
सध्या राज्यात ६२ लाख हेक्टरवर वनक्षेत्र आहे. हे वनक्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी वनविभागाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये वनांमधील अनधिकृत वृक्षतोड, चोरी आणि आग यांसारख्या घटनांची माहिती तत्काळ मिळावी यासाठी माहिती तंत्राचा वापर सुरू केला आहे. याचा एक भाग म्हणून नागपूर येथे सॅटेलाइट कमांड कंट्रोल रूम उभारण्यात आली असून ऑगस्टपासून ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. यामुळे राज्यातील वनक्षेत्र या कक्षेत येणार आहे. याशिवाय वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक जीपदेखील दिल्या आहेत. वनविभाग अधिकाधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या राज्यात २२ टक्के असलेल्या अनवत क्षेत्रात ३३ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार असल्याचेही श्री. खार्गे यांनी सांगितले. या वेळी जिल्हाधिकारी रणजितकुमार, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. देवरे, तहसीलदार नागेश पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे उपस्थित होते.
पंढरपुरात फुलणार तुळशी वृंदावन
हरित पंढरपूर या उपक्रमांतर्गत वनविभाग आणि नगरपालिकेच्या सहभागातून येथील यमाई तलाव परिसरातील पाच एकर जागेवर तुळशी वृंदावन तयार करण्यात येणार आहे. या जागेची पाहणी वनविभागाचे मुख्य सचिव विकास खार्गे, जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी केली. येथील पाच एकर जागेवर येत्या १ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते तुळसीरोपण करण्यात येणार आहे. यामध्ये श्याम तुळस, राम तुळस, पांढरी तुळस, कृष्ण तुळस यासह आठ जातींच्या तुळशी रोपांची लागवड केली जाणार असल्याचेही श्री. खार्गे यांनी सांगितले.