अधिकारी, कर्मचाऱ्यांना ठेवी वाढविण्याचे टार्गेट - राजन पाटील
सोलापूर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत ठेवी
वाढविण्यासाठी बॅंकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम तयार
केला आहे. यात बॅंकेतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची प्रमुख भूमिका असणार
आहे. यानुसार अधिकारी व कर्मचारी ठेवीदारांच्या गाठीभेटी घेऊन बॅंकेत ठेव
ठेवण्यासाठी त्यांची मनधरणी करणार आहेत.
बॅंकेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला ठेवी वाढविण्याचे स्वतंत्र टार्गेट दिले आहे. कोणी किती ठेवी आणल्या? यावरून त्यांचे वार्षिक कामाचे मूल्यांकन होणार आहे. अधिकाधिक ठेवी आणणाऱ्यांना पगारवाढ मिळणार असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष पाटील यांनी दिली. जिल्हा बॅंकेच्या २०० शाखांमध्ये सध्या एक हजार ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. बॅंकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी दर महिना तीन कोटी ७५ लाख खर्च होतो. सध्या हा खर्च बॅंकेला जड जात आहे. त्यामुळे, बॅंकेच्या प्रशासन विभागाकडून विविध उपाययोजना आखून खर्च कमी करण्यावर भर दिला जात आहे.
रोजंदारी कर्मचाऱ्यांना दोन दिवस सुटी
बॅंकेत रोजंदारीवर काम करणाऱ्यांना पूर्वी महिन्यातून एक दिवसाची सुटी मिळायची, आता त्यांना दोन दिवसांची सुटी बंधनकारक केली आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सुट्यांमुळे बॅंकेची दर महिना एक लाख रुपयाची बचत होत असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.
लिपिक तसेच इतर कर्मचाऱ्यांना ठेवी वाढविण्यासंबंधी टार्गेट दिले आहे. तसेच कर्जवसुली अधिकाऱ्यांना कर्जवसुलीचे टार्गेट आहे. दिलेले टार्गेट पूर्ण करणाऱ्यांना चांगली पगारवाढ दिली जाणार आहे.