पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रामचंद्र सरवदेे उपाध्यक्षपदी भगवान वानखेडे यांची निवड


 

पंढरपूर : येथील पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रामचंद्र सरवदे तर उपाध्यक्षपदी  भगवान वानखेडे, राजेंद्र कोरके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

         पंढरपुरातील विश्रामगृहामध्ये पत्रकार संघाची बैठक महेश खिस्ते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत कार्याध्यक्षपदी अनिरुध्द बडवे, खजिनदार अमोल कुलकर्णी, सचिव प्रवीण नागणे, प्रसिध्दीप्रमुख राजाभाऊ शाहपूरकर यांची निवड करण्यात आली आहे.

          यावेळी नंदकुमार देशपांडे, अभिराज उबाळे, हरीभाऊ प्रक्षाळे, श्रीकांत कसबे, दिनेश खंडेलवाल, विकास पवार, संकेत कुलकर्णी, गौतम जाधव, , नितीन शिंदे, महालिंग दुधाळे, राजेश शिंदे, दत्ता पाटील, संजय कोकरे, यादव महेश कदम, शंकर कदम, संतोष कुलकर्णी, यशवंत कुंभार, कुमार कोरे, शरद कारटकर, संजय घोडके आदी उपस्थित होते.