मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पदभार स्वीकारला

मुंबई – 31 जानेवारी : मुंबईचे नवे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी आज पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ आयपीएस अधिकारी पडसलगीकर यांनी पदाची सूत्रं स्वीकारली. प्रामाणिक आणि सचोटीचे अधिकारी म्हणून पडसलगीकर यांची पोलीस दलात आळख आहे.
Newly elected Mumbai Police Commissioner Datta Padsalgikar with outgoing Police Commissioner Ahmed ...जावेद अहमद सेवानिवृत्त होताच पडसलगीकर यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच शिक्कामोर्तब केलं होतं. दरम्यान, अहमद जावेद यांची सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय पोलीस सेवेच्या 1982 च्या तुकडीतील अधिकारी असलेले पडसलगीकर हे गेल्या काही वर्षांपासून केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. राज्यसेवेत परत येण्यापूर्वी ते गुप्तचर यंत्रणा अर्थात आयबीमध्ये कार्यरत होते. त्यापूर्वीही त्यांनी देश- विदेशात महत्त्वाच्या पदावर काम केलं आहे. मुंबई पोलीस दलातही त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. पडसलगीकर मुंबईच्या लोकलमधील साखळी स्फोटांच्या तपास पथकात होते.
दरम्यान, पडसलगीकर यांना त्यांच्या होम केडरवर म्हणजेच महाराष्ट्रात पाठवण्याची मागणी करणारं पत्र महाराष्ट्र सरकारने केंद्रीय गृहविभागाला पाठवलं होतं. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदाची माळ त्यांच्या गळयात पडली.